प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची झाली होती लागण

news anchor Rohit Sardana dies

Rohit Sardana dies : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दीर्घकाळ झी न्यूजमध्ये अँकर राहिलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये अँकर म्हणून कार्यरत होते. सुधीर चौधरींनी याबाबत ट्वीट केले की, ‘आता थोड्याच वेळापूर्वी जितेंद शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जे सांगितले ते ऐकून थरकाप उडाला. आमचे मित्र आणि सहयोगी रोहित सरदाना यांच्या मृत्यूची बातमी होती. हा व्हायरस आमच्या एवढ्या जवळच्या व्यक्तीला नेईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. मी यासाठी तयार नव्हतो. ॐ शान्ती.’ Famous news anchor Rohit Sardana dies of heart attack, also infected with Covid 19


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दीर्घकाळ झी न्यूजमध्ये अँकर राहिलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये अँकर म्हणून कार्यरत होते. सुधीर चौधरींनी याबाबत ट्वीट केले की, ‘आता थोड्याच वेळापूर्वी जितेंद शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जे सांगितले ते ऐकून थरकाप उडाला. आमचे मित्र आणि सहयोगी रोहित सरदाना यांच्या मृत्यूची बातमी होती. हा व्हायरस आमच्या एवढ्या जवळच्या व्यक्तीला नेईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. मी यासाठी तयार नव्हतो. ॐ शान्ती.’

दीर्घकाळापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा चेहरा राहिलेले रोहित सरदाना सध्या ‘आज तक’मधील ‘दंगल’ शोची अँकरिंग करत होते. 2018 मध्ये रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही रोहित सरदाना यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर श्रद्धांजली देताना म्हटले की, ‘मित्रांनो अत्यंत दु:खद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. त्यांना आज सकाळीच हार्ट अटॅक आला आहे. त्यांच्या कुटुंबीयाप्रति माझ्या संवेदना.’

Famous news anchor Rohit Sardana dies of heart attack, also infected with Covid 19

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात