कोल्हापूर, सांगलीला पावसाने झोडपले; केळी, पापईच्या बागांचे प्रचंड नुकसान


वृत्तसंस्था

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटात आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तुफान गारा बरसल्या. या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. कागल तालुक्यातील गावांत गारांचा वर्षाव झाला होता. Kolhapur, Sangli was lashed by rains



केळी, पपईच्या बागांचे नुकसान

वाळवा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. केळी, पपईच्या बागा आणि ग्रीन हाउसचे प्रचंड नुकसान झाले. तसेच, विजेचा खेळखंडोबा झाला होता. पुणे-बंगळुरू महामार्गालगतची झाडे पडली.
सांगली जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढगांची गर्दी झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सांगलीत हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

Kolhapur, Sangli was lashed by rains

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात