पुणे मेट्रोची गौरवास्पद कामगिरी, मुठा नदीखालून भुयारी मार्ग पूर्ण


पुणे मेट्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मागार्चा मुठा नदीखालच्या भागाचे काम पुर्ण झाले. खोदकाम करणारे टीबीएम आता नदीपार करून पूढे गेले आहे. नदीच्या तळाखालून १३ मीटर खोलीवर हा बोगदा आहे. नदीपुढे आता कसबा पेठेतील महापालिकेच्या दादोजी कोडदेव शाळेकडे खोदकाम सुरू होईल.Glorious performance of Pune Metro, completion of subway under Mutha riverGlorious performance of Pune Metro, completion of subway under Mutha river


विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे मेट्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मागार्चा मुठा नदीखालच्या भागाचे काम पुर्ण झाले. खोदकाम करणारे टीबीएम आता नदीपार करून पूढे गेले आहे.

नदीच्या तळाखालून १३ मीटर खोलीवर हा बोगदा आहे. नदीपुढे आता कसबा पेठेतील महापालिकेच्या दादोजी कोडदेव शाळेकडे खोदकाम सुरू होईल.शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर मुठा नदी आणि त्यापुढे दाट लोकवस्तीचा भाग आहे.


मेट्रो यंदा धावणार, 24 × 7 पाणी योजनेस गती, 650 टन कचऱ्यापासून विजनिर्मितीवर भर देणार; पुणे महापालिकेच्या विकास प्रकल्पांचा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा


त्यामुळे या भागातून मेट्रो नेण्यासाठी भुयारी पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुठा नदीवर अनेक पूल आहेत. त्यातील काही तर शतकापूर्वी बांधलेले आहेत. मात्र, मुठा नदीखालील हा पहिलाच बोगदा आहे, असे पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

शिवाजीनगर ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या मार्गावर दोन भुयारी मार्ग आहेत. यातील एक २४० मीटरचा तर दुसरा २२३ मीटरचा आहे. मुठा नदीखालील बोगदा पूर्ण करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ लागला.

या कामात कोणताही अडथळा आला नाही. स्वारगेटच्या बाजुनेही एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. स्वारगेट ते मंडई या दरम्यान हा ४८० मीटरचा बोगदा आहे.त्याचबरेबर कृषि महाविद्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या दरम्यान १.६ किलोमीटरच्या मार्गाचा बोगदा पूर्ण झाला आहे.

या मार्गावरील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर कोर्ट या दोन स्टेशनच्या दरम्यानचा हा बोगदा पूर्ण झाला आहे. फडके हौद स्टेशनपर्यंतच्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे.

Glorious performance of Pune Metro, completion of subway under Mutha riverGlorious performance of Pune Metro, completion of subway under Mutha river

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात