रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची पुण्यात लूट, २२ पोलिसांच्या मुख्यालयामध्ये बदल्या


वृत्तसंस्था

पुणे : लॉकडाऊनमुळे गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात आहे. रेल्वे पोलिसांचे कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप आहे. परंतु, पोलिसांच्या वेशातील भामटे असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला. दारम्यान, या प्रकरणी 22 पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. 22 transferred to police headquarters

रेल्वेचं तिकीट पाहून त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो. रेल्वेमध्ये प्रवेश करण्यास आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली जाते. ती नाहीत हे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.
रेल्वे प्रवासी सल्लागार समितीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण हा पोलिसांचा विषय आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्याकडे याची तक्रार पोचताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर नेमणुकीस असलेल्या 22 पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत. एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

22 transferred to police headquarters

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था