Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण : २४ तासांतील भयावह चित्र


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउनचे निर्बंध लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव घेत नसल्याचे गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात बुधवारी (ता.२८ ) ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. दिलासादायक बाब म्हणजे ६१ हजार १८१ रुग्ण बरे झाले आहेत. Maharashtra Corona Update: 985 deaths in the state, 63 thousand 309 people infected with coronaरुग्णांची आकडेवारी खाली येत नाही आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. गेल्या २४ तासांत ६३ हजार ३०९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण अॅक्टिव रुग्णांचा आकडा ६ लाख ७३ हजार ४८१ वर गेला आहे. तसेच, लागण झालेल्या व्यक्तींची संख्या देखील ४४ लाख ७३ हजार ३९४ झाली आहे. दिलासादायक म्हणजे २४ तासांत ६१ हजार १८१ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील मृतांचा आकडा

राज्यात ९८५ रुग्णांचा मृत्यू झाला. आता एकूण मृतांचा आकडा ६७ हजार २१४ झाला आहे. दरम्यान पुणे शहरात ३ हजार ९७८ रुग्ण आढळले. ४ लाख १० हजार ५०४ एवढी रुग्णसंख्या झाली. बुधवारी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ६ हजार ६६९ झाली. ४ हजार ९३६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर ३ लाख ५९ हजार ७७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत ४ हजार ९६६ नवे रुग्ण

मुंबईत ४ हजार ९६६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख ४० हजार ५०७ झाला असून त्यापैकी ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा १२ हजार ९९० झाला.

Maharashtra Corona Update : 985 deaths in the state, 63 thousand 309 people infected with corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती