गोल्फर आदिती अशोक हिची उत्तम कामगिरी; परंतु पदक थोडक्यात हुकले


वृत्तसंस्था

टोकियो : टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय गोल्फर आदिती अशोक तिने जपान आणि अमेरिकेच्या गोल्फरना जोरदार टक्कर दिली आणि आपल्या गटात ती चौथ्या स्थानावर राहिली. Excellent performance by golfer Aditi Ashok; But the medal was short-lived

तिच्या या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी घेतली असून या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. आदितीने आपल्या देशाची मान जगभरात उंचावली आहे. तिने जिद्दीने खेळ केला. ही जिद्द करोडो भारतीय मुलींसाठी आणि खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असे कौतुक राष्ट्रपतींनी केले.



टोकियोमधील खराब हवामानामुळे गोल्फचा खेळ काही काळ थांबविण्यात आला होता. परंतु हवामानात सुधारणा झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. त्यावेळी आदिती आणि अमेरिका, जपान यांच्या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस होती. ही चुरस वाढून खेळाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली. यात यामध्ये आदित्य अशोक ही चौथ्या स्थानावर राहिली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय गोल्फर ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आदित्य अशोक कौतुक केले आहे. आपल्या सर्व खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिकमध्ये जिद्दीने खेळ केला. देशाची मान जगभरात उंचावली. त्यांची मेहनत आणि लगन यांना सर्व भारतीय प्रणाम करतील, अशा शब्दांत मोदींनी खेळाडूंचे कौतुक केले खेळाडूंचे कौतुक केले आहे.

आदिती अशोक हिच्या उत्तम कामगिरीनंतर आता करोडो भारतीयांच्या नजरा पहिलवान दीपक पुनियावर लागल्या आहेत. त्याची आज ब्राँझ पदकासाठीची लढत होत आहे. ही लढत जिंकली तर भारताच्या खात्यात सातवे सहावी पदक येईल.

Excellent performance by golfer Aditi Ashok; But the medal was short-lived

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात