Covid 19 Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 50 कोटींच्या पुढे, अवघ्या 20 दिवसांत 10 कोटी डोस दिले, आतापर्यंतची आकडेवारी वाचा सविस्तर…

india covid 19 vaccination coverage crosses landmark milestone of 50 crore

Covid 19 Vaccination : भारतात कोरोना लसीकरणाचा टप्पा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. भारताला 50 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यासाठी 203 दिवस लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 कोटी 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत, ज्यात 38 कोटी 94 लाख 75 हजार 520 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 11 कोटी 8 लाख 73 हजार 346 लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. india covid 19 vaccination coverage crosses landmark milestone of 50 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाचा टप्पा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. भारताला 50 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यासाठी 203 दिवस लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 कोटी 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत, ज्यात 38 कोटी 94 लाख 75 हजार 520 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 11 कोटी 8 लाख 73 हजार 346 लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत.

भारतात कोरोना लसीकरणाला आता पुरेसा वेग आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते..

  • 0-10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 85 दिवस लागले
  • 10-20 कोटीसाठी 45 दिवस
  • यानंतर 20-30 कोटींमध्ये 29 दिवस
  • 30-40 कोटींमध्ये 24 दिवस
  • आणि 50 कोटी लसीकरणाला फक्त 20 दिवस लागले

शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभरात 43 लाख 29 हजार 673 डोस दिले गेले, त्यापैकी 32 लाख 10 हजार 613 जणांना पहिला डोस देण्यात आला. 11 लाख 19 हजार 60 लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

आतापर्यंत अशा प्रकारे वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण झाले आहे…

  • 1 कोटी 3 लाख 28 हजार 503 आरोग्यसेवकांना पहिला डोस आधीच मिळाला आहे. तर 79,51,876 आरोग्यसेवकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
  • पहिल्या डोससाठी 1 कोटी 80 लाख 48 हजार 937 फ्रंटलाइन वर्कर्स आणि
  • 1 कोटी 16 लाख 50 हजार 548 आरोग्यसेवकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
  • 18 ते 44 वयोगटात 17 कोटी 23 लाख 20 हजार 394 लोकांना पहिला डोस मिळाला. त्याच वेळी, 1 कोटी 12 लाख 56 हजार 317 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
  • 45 ते 59 वयोगटात, 11,07,66,863 लोकांना पहिला आणि 4,19,23,920 जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
  • 60 वर्षांवरील 7,80,10,823 लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 3,80,90,685 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांनी 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीचे 1 कोटीहून अधिक लस डोस दिले आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांनी 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

पीएम मोदींचे ट्वीट..

या ऐतिहासिक क्षणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून कौतुक केले आहे. पीएम मोदी ट्वीटमध्ये म्हणाले की, कोविड -19 विरूद्ध भारताच्या लढाईला जोरदार चालना मिळाली आहे. लसीकरणाच्या आकड्याने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. आम्हाला आशा आहे की, या संख्येत वाढ करू तसेच आम्ही आमच्या नागरिकांना #SabkoVaccineMuftVaccine मोहिमेअंतर्गत लसीकरण होण्याची खात्री आहे.

india covid 19 vaccination coverage crosses landmark milestone of 50 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात