अफगाणिस्तानात ३०० दहशतवादी ठार, सैनिकांची धडक कारवाई


विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्याचवेळी १२५ हून अधिक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तान नॅशनल सिक्युरिटी फोर्सने नांगरहार, लगमन, गझनी, पक्तिका, कंदाहार, जाबूल, हेरत, जोजजान, समांगन, फरयाब, सर ए पोल, हेलमंद, निमरूज, बगलान आणि कपिसा प्रांतात जोरदार कारवाई केली. 300 terrorist died in Afganistan



कंदाहारच्या परिसरात अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात १६ तालिबानी दहशतवादी मारले गेले तर दहा जखमी झाले. बागलान प्रांतात सुरक्षा दलाने तालिबानचे २३ दहशतवादी मारले आणि त्यात चार जखमी झाले आहे. त्यांचा शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जाबुल परिसरात हवाई दलाने अफगाणिस्तान सैनिकांच्या मदतीने ६० दहशतवादी ठार केले आणि यात ११ जण जखमी झाले.

हवाई दलाच्या विमानांनी बल्ख प्रांतात देहदादी जिल्ह्यात देखील कारवाई केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ववस्त करण्यात आले. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या मंत्रालयाने हवाई हल्ल्याचे दोन व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

300 terrorist died in Afganistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात