अफगाणिस्तानातील वाढता हिंसाचार जगाच्या शांततेसाठी धोकादायक – भारताने दिला सावधानतेचा इशारा


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही हल्ले होत आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास त्याचा जगावर परिणाम होणार असल्याची प्रतिक्रिया भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केली. India warns world



संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले,‘‘ अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. या देशात मे आणि जूनमध्ये संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत बळी पडलेल्यांपेक्षा अधिक आहे. तेथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास भारताला त्याचा थेट धोका आहे.

आपल्या एका महिन्याच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताकडून दहशतवाद, सागरी सुरक्षा आणि शांतता मोहिमा या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. सागरी सुरक्षा या विषयावर ९ ऑगस्टला खुली चर्चा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेच्या अध्यक्षस्थानी असतील. ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील.

India warns world

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात