Sunetra Pawar : अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत

Sunetra Pawar

 विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.Sunetra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र याच बैठकीत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळत नसल्याबद्दल उघडपणे खंत व्यक्त केली. अजित पवार हयात असताना अर्थखाते त्यांच्याकडेच असल्याने त्याच न्यायाने हे खाते आताही राष्ट्रवादीलाच मिळावे अशी पक्षाची रास्त अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थखाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.Sunetra Pawar



पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र याच बैठकीत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळत नसल्याबद्दल उघडपणे खंत व्यक्त केली. अजित पवार हयात असताना अर्थखाते त्यांच्याकडेच असल्याने त्याच न्यायाने हे खाते आताही राष्ट्रवादीलाच मिळावे अशी पक्षाची रास्त अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थखाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते.

Sunetra Pawar Expresses Disappointment Over Finance Portfolio Allocation

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात