Constitution Day: मोदी म्हणतात – काश्मीर टू कन्याकुमारी-पार्टी फॉर द फॅमिलीचा भारतीय संविधानाला धोका!


२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत भाजप देशभर संविधान गौरव अभियान चालवणार आहे. ज्यामध्ये यात्रा काढण्याबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. Constitution Day: Modi says – Kashmir to Kanyakumari-Party for the Family is a threat to Indian Constitution!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन हाभारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजच्या २६ नोव्हेंबर या दिवसाला एक वेगळं महत्व आहे.हा तोच दिवस आहे ज्या वेळी देश पारतंत्र्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र भारतानं संविधान स्वीकारलं. दरम्यान २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत भाजप देशभर संविधान गौरव अभियान चालवणार आहे. ज्यामध्ये यात्रा काढण्याबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.

पंतप्रधान मोदींचं ट्विट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची एक प्रत पोस्ट केली आहे. ४ नोव्हेंबर १९४८ च्या संविधान सभेतील भाषणातला हा मजकूर आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारण्याचा प्रस्ताव संविधान समितीपुढे ठेवला होता.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की संविधान कितीही व्यवस्थित, सुंदर तयार केले असले तरी देशाचे खरे सेवक खंभीर, निस्वार्थी असल्याशिवाय संविधान काही करु शकत नाही म्हणत डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.भारताला एक संविधानिक लोकशाही पंरपरा आहे. राजकीय पक्ष संविधानातील भावना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. राजकीय पक्ष स्वत:चं लोकशाही स्वरुप गमावून बसतात त्या लोकशाहीच रक्षण कशा करु शकतात.

लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपल्याला देशातील जनतेला जागृत करण्याची गरज आहे. आपल्याला लोकांच्यात जाण्याची गरज आहे. न्यायालयानं एखाद्या व्यक्तीला भ्रष्टाचारी ठरवत शिक्षा दिली असली तरी त्याचं राजकीय कारणासाठी प्रतिमासंवर्धन होत असेल, राजकीय लाभासाठी सर्व मर्यादा तोडल्या जात असतील तर देशातील युवकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं होतं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अमित शहा यांचं ट्विट

गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, संविधान एकता आणि देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना नमन करत आदर व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांबरोबरच संरक्षणमंंत्री राजनाथ सिंह यांनीही संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 Constitution Day: Modi says – Kashmir to Kanyakumari-Party for the Family is a threat to Indian Constitution!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात