जवानांसोबत थिरकला बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार


काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने जवानांसोबत दिवस घालविला. त्यांच्यासोबत त्याने डान्सही केला.Bollywood actor Akshay Kumar with the jawans


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने जवानांसोबत दिवस घालविला. त्यांच्यासोबत त्याने डान्सही केला.
अक्षय दुपारी बाराच्या सुमारास गुरेझ व्हॅलीमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचला. या वेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते.

अक्षयने त्यांच्यासोबत डान्सही केला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून समोर आले आहेत. काही फोटो स्वत: अक्षयने शेअर केले आहेत.अक्षयने हे फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना म्हटले आहे की, बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला.



बीएसएफचे सैनिक आज सीमेचे रक्षण करत आहेत. इथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो. या हीरोंना भेटल्यावर माझ्या हृदयात फक्त एक आदर असतो. अक्षयचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अक्षय भारतीय सैन्य आणि सैनिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येतो. २०१७ मध्ये त्याने सैनिकांसाठी भारत के वीर नावाचा एक उपक्रमसुद्धा सुरू केला. या माध्यमातून देश आणि लोकांच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कुटूंबियांची मदत केली जाते.

सैनिक, बेबी, हॉलिडे या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता लवकरच अक्षयचे बेल बॉटम आणि सुर्यवंशी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Bollywood actor Akshay Kumar with the jawans

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात