Bellbottom : अक्षय कुमारच्या फँन्ससाठी खूषखबर ; या दिवशी सिनेमागृहात ‘बेलबॉटम’

अक्षय कुमारच्या फँन्सची प्रतीक्षा आता संपनार आहे. अक्षय कुमारच्या नवीन सिनेमाची वाट सर्वच पाहत होते. 


विशेष प्रतिनिधी

मुंबई:अक्षय कुमारच्या फँन्ससाठी खुशखबर आहे  अक्षय कुमारच्या नवीन सिनेमाची वाट सर्वच पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. लॉकडाऊननंतर अक्षय कुमारचा बेलबॉटम हा सिनेमा २७ जुलैला जगभरात रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मिडीयावर पोस्ट करत त्याच्या फँन्सना ही माहिती दिली. बेलबॉटम हा सिनेमा ओटीटीवर नाही तर सिनेमागृहात रिलीज होणार आहे.Bell Bottom: Akshay Kumar’s Film To Release In Cinemas Worldwide On…

https://www.instagram.com/p/CQIRUSRFzNr/?utm_source=ig_web_button_share_sheet

या चित्रपटात अक्षय कुमार एका नव्या अवतारात दिसणार आहे.या चित्रपटाचे शूटिंग बर्‍याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. गेल्या वेळी लॉकडाऊननंतरच अक्षयने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. तेव्हापासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी वाट पाहत आहे. अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, बेलबॉटमसाठी आपली फी 30 कोटींपेक्षा कमी करण्यास अक्षयने मान्यता दिली आहे. पण, अक्षयने या बातमीला अफवा म्हटले होते.

चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट 1980च्या दशकावर आधारित असून, यात खिलाडी कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या लूकमध्ये तो खूप डॅशिंग दिसत आहे. टीझरमध्ये अक्षय वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन हे कलाकार दिसणार आहेत.

Bell Bottom: Akshay Kumar’s Film To Release In Cinemas Worldwide On…