अशी आहे प्रदीप शर्मांची वादळी कारकीर्द, 113 एन्काउंटर ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक, आता NIA ने केली अटक

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबईच्या अँटिलिया प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक केली आहे. प्रदीप शर्मा आणि वाद यांचा दीर्घकाळापासून संबंध आहे. आता या प्रकरणात त्यांचे नाव माजी एपीआय सचिन वाझे यांच्याशी जोडले जात आहे. यामुळेच एनआयएच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला आणि प्रदीप शर्मा यांना अनेक तास चौकशीनंतर अटक केली. प्रदीप शर्मांच्या वादळी कारकीर्दीविषयी येथे माहिती देत आहोत… Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबईच्या अँटिलिया प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक केली आहे. प्रदीप शर्मा आणि वाद यांचा दीर्घकाळापासून संबंध आहे. आता या प्रकरणात त्यांचे नाव माजी एपीआय सचिन वाझे यांच्याशी जोडले जात आहे. यामुळेच एनआयएच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला आणि प्रदीप शर्मा यांना अनेक तास चौकशीनंतर अटक केली. प्रदीप शर्मांच्या वादळी कारकीर्दीविषयी येथे माहिती देत आहोत…

धुळ्यात झाले लहानाचे मोठे

एकेकाळी मुंबईचे टॉप कॉप राहिलेले प्रदीप शर्मा मूळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहेत. त्यांचा जन्म आग्रामध्येच झाला होता. त्यांचे वडील इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांना महाराष्ट्रातील धुळ्यातील महाविद्यालयात नोकरी मिळाली. मग ते आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात आले. त्यानंतर तिथेच स्थायिक झाले. प्रदीप शर्मा धुळ्यामध्येचे लहानाचे मोठे झाले आणि शिक्षणही तिथेच पूर्ण केले. प्रदीप शर्मांनी एम.एस्सी. केली.

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

पहिली पोस्टिंग

यानंतर 1983 मध्ये प्रदीप शर्मा यांची महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रदीप शर्मांची पहिली पोस्टिंग मुंबईतील माहीम पोलिस स्टेशनमध्ये होती. तिथे ते काही काळ राहिले आणि त्यानंतर तो जुहू पोलिसांच्या विशेष शाखेत तैनात झाले. हळूहळू त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली.

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

असे बनले एन्काउंटर स्पेशालिस्ट…

1990 च्या दशकात मुंबईवर अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते. गुंड माफिया मुंबईवर राज्य करायचे. कायदा आणि पोलिस ही त्यांना खेळणे वाटायचे. यामुळे गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने एक विशेष पथक तयार केले. यात प्रदीप शर्मा यांच्यासह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या काही निवडक अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर ही टीम अंडरवर्ल्डचा खात्मा करण्याच्या कामी लागली. एका पाठोपाठ एन्काउंटरमध्ये गुन्हेगार ठार होऊ लागले. या पथकात सामील असलेले पोलिस अधिकारी आणि हे पथक एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रदीप शर्मा यांचे नाव वृत्तपत्रांच्या अग्रलेखात झळकू लागले. प्रदीप शर्मांच्या नावाची दहशत अंडरवर्ल्डवर दिसू लागली. पोलिस विभागातही त्यांचा दर्जा वाढला. त्यांना मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर बढती देण्यात आली. तोपर्यंत त्यांनी पोलीस सेवेत 25 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या नावे 113 एन्काउंटरची नोंद झाली. प्रदीप शर्मांनी केवळ गुंडांनाच नव्हे तर अनेक दहशतवाद्यांना ठार केले. अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही शर्मांनी अटक केली होती.

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

वादांना सुरुवात

26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा यांनी गुन्हे शाखेत एकत्र काम करत सुभाष मकाडवाला आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा गुरू श्रीकांत मामा यांना चकमकीत ठार केले. काही काळानंतर प्रदीप शर्मा यांना गुन्हे शाखेतून अँटी नार्कोटिक्स विभागात नियुक्त करण्यात आले.

2006 मध्ये वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मागे शुक्लकाष्ठ सुरू झाले. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा गुंड रामनारायण गुप्ता हा प्रदीप शर्मांकरवी चकमकीत ठार झाला. पण तपास केला असता ती चकमक बनावट निघाली. प्रदीप शर्मा यानंतर मोठ्या वादात अडकले. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने या खटल्याची सुनावणी करताना प्रदीप शर्मांना दोषी ठरवत त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्र सरकारने प्रदीप शर्मा यांना 2008 मध्ये पोलिस सेवेतून काढून टाकले.

यानंतर त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल झाले. पण 2013 साली कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर 4 वर्षे त्यांनी पोलीस विभागात परत जाण्यासाठी धडपड केली. सन 2017 मध्ये त्यांना पुन्हा महाराष्ट्र पोलीस सेवेत घेण्यात आले. तथापि, यादरम्यान त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधांचा आरोपदेखील करण्यात आला. नंतर कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले.

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक

सन 2019 मध्ये प्रदीप शर्मा यांनी अचानक पोलिस सेवेतून व्हीआरएस घेतली. यानंतर ते राजकारणाकडे वळले आणि त्यांनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले. मुंबईच्या नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली. पण ते निवडणूक हरले. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. प्रदीप शर्मा यांनी 35 वर्षे पोलिसांत काम केले. यादरम्यान ते कायम चर्चेत आणि वादात राहिले. आता प्रदीप शर्मा स्वत:ची स्वयंसेवी संस्था चालवतात.

Know About Pradeep Sharma Once Top Cop 113 Encounters To Election on Shivsena Ticket

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था