नोव्हाव्हॅक्स लस प्रभावी ठरल्यानंतर आता सीरमकडून जुलैमध्ये लहान मुलांवरील चाचणीला सुरुवात

serum institute of india plans to start clinical trials of the novavax shot for children in july

 clinical trials of the novavax shot for children : अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सहकार्याने ऑक्सफर्डची कोरोना लस तयार करणार्‍या पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम इन्स्टिट्यूट आता लहान मुलांवर नोव्हाव्हॅक्स लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. serum institute of india plans to start clinical trials of the novavax shot for children in july


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सहकार्याने ऑक्सफर्डची कोरोना लस तयार करणार्‍या पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम इन्स्टिट्यूट आता लहान मुलांवर नोव्हाव्हॅक्स लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे.

वृत्तसंस्था एएनआयने म्हटले की, जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर नोव्हाव्हॅक्स लसीची चाचणी घेऊ शकते. यासह, एएनआयने म्हटले की, सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपर्यंत देशात नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकी कंपनीची कोरोना लस उपलब्ध होण्याची अपेक्षा करत आहे.

नोव्हाव्हॅक्स ट्रायलचा डेटा दिलासादायक

केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले की, कोविड-19 विरुद्ध नोव्हाव्हॅक्स लसीच्या परिणामकारकतेविषयीची आकडेवारी आशादायक व प्रोत्साहन देणारी आहे. याच्या क्लिनिकल ​​ट्रायल भारतात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारीदेखील लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी असल्याचे दर्शवते.

ते म्हणाले, “उपलब्ध आकडेवारीवरून आपण जे पाहत आहोत, त्यावरून ही लस खूपच सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दिसते. ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार आहे.” यासंबंधीची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वीच पूर्ण केली आहे.

पुढील महिन्यापासून मुलांवरील चाचणी

ते म्हणाले, “आशा आहे की या लसीची मुलांवरही चाचणी करण्यास सुरुवात होईल. ही आमची विशेष रुची आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीस लसीकरणाची गती वाढेल तेव्हा आपल्याला ग्राउंड लेव्हला त्याचा प्रभाव दिसेल. देशभर लसीचा वेगवान प्रसार व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम सुरू आहे.

नोव्हाव्हॅक्स इंक. ज्यांनी लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे सोमवारी त्यांनी म्हणाले की, त्यांची लस कोविड-19 विरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. सर्व प्रकारच्या व्हेरिएंटपासून संरक्षण प्रदान करते. कंपनीने म्हटले की, ही लस एकूणच 90.4 टक्के प्रभावी आहे आणि प्राथमिक डेटामध्ये ती सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

serum institute of india plans to start clinical trials of the novavax shot for children in july

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात