या १८ घटना काय सांगतात? जेव्हा बळजबरी ‘जय श्री राम’ म्हणायला लावल्याचे दावे खोटे ठरले

18 incidents found false claim of jai shri ram leftist media narrative mob lynching

jai shri ram : माध्यमांना हिंदू प्रतीकांचा इतका द्वेष आहे की अनेक वर्षांपासून ‘जय श्रीराम’सारख्या पवित्र शब्दाची बदनामी करण्याचे प्रयत्न चालू आहेत, विशेषत: भाजपची सत्ता आल्यापासून. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ‘बळजबरी जय श्रीराम म्हणायला लावले’ ही कहाणी तयार झाली आणि अनेक घटनांमध्ये ती जबरदस्तीने घुसडण्यात आली. येथे अशाच काही घटनांबद्दल माहिती देण्यात येत आहोत. 18 incidents found false claim of jai shri ram leftist media narrative mob lynching


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माध्यमांना हिंदू प्रतीकांचा इतका द्वेष आहे की अनेक वर्षांपासून ‘जय श्रीराम’सारख्या पवित्र शब्दाची बदनामी करण्याचे प्रयत्न चालू आहेत, विशेषत: भाजपची सत्ता आल्यापासून. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ‘बळजबरी जय श्रीराम म्हणायला लावले’ ही कहाणी तयार झाली आणि अनेक घटनांमध्ये ती जबरदस्तीने घुसडण्यात आली. येथे अशाच काही घटनांबद्दल माहिती देण्यात येत आहोत.

‘मुस्लिम वृद्धाला मारहाण, जय श्रीराम म्हणायला लावले – पोलिसांनी नाकारले

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका मुस्लिम वृद्धाला बळजबरी ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले, असा आरोप होता. मुस्लिम वृद्धाची 4 अज्ञात तरुणांनी जबरदस्तीने दाढी केली आणि मारहाण केली. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि ऑल्ट न्यूजच्या जुबैर यांनी ‘जय श्रीराम’च्या बदनामीचा विडा उचलला. या दोघांनी आरोपींपैकी आरिफ आणि मुशाहीद यांची नावे लपविली. हे प्रकरण ताईतावरून झालेल्या भांडणाचे निघाले.

दंगल भडकवण्यासाठी मुस्लिमांनीच मशिदीच्या भिंतींवर ‘जय श्रीराम’ लिहिले

भैंसाचे एएसपी किरण खरे म्हणाले की, ज्या लोकांनी मशिदीच्या भिंतींवर जय श्रीराम लिहिले त्यांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली. मोहम्मद अब्दुल कैफ आणि एक अल्पवयीन आरोपी आहे. ही घटना तेलंगणाच्या भैंसा येथील होती. काही महिन्यांपूर्वी तेथे हिंदू समुदायाविरोधात दंगा उसळला होता आणि त्यामुळे तेथे धार्मिक तणाव निर्माण झाला होता.

तनिष्क स्टोअरमध्ये ‘जय श्रीराम’ची दहशत? फॅक्ट चेकर जुबैरकडून हिंदूंची बदनामी

ट्विटरवर तनिष्क जाहिरात विवादाचा फायदा घेताना मोहम्मद जुबैरने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, ‘जय श्रीराम’चा जयघोष करून तनिष्कच्या शोरूमवर हल्ला करण्याचा किंवा तनिष्क स्टोअरमध्ये उपस्थित लोकांना धमकावण्याचा कट रचला जात होता किंवा प्रयत्न सुरू होते आणि हिंदू तनिष्क स्टोअरच्या बाहेर आक्रमकपणे निषेध करत असून शोरूममध्ये उपस्थित प्रत्येकावर दबाव आणत आहेत. परंतु ही बाब दिशाभूल करणारी निघाली.

वास्तविक, व्हिडिओमध्ये असे दिसून आले होते की लोक प्रत्यक्षात निदर्शने करत होते, परंतु मोहम्मद जुबैरने हिंदूंना लक्ष्य करत त्याच्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला, तसे घडले नाही. जुबैरच्या पोस्टवर, ‘बेफिटिंग फॅक्ट’ नावाच्या ट्विटर युजरने तनिष्क शोरूमच्या बाहेर निषेधाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. शोरूमच्या बाहेर जमिनीवर बसलेले काही लोक शांततेत ‘जय श्रीराम’चा जयजयकार करत होते.

यूपी कॅब ड्रायव्हरच्या मृत्यूचे रहस्य

गौतम बुद्ध नगरमध्ये आफताब आलम नावाच्या कॅब चालकाचा मृत्यू झाल्याचा दावा करत मोहम्मद असिफ खान नावाच्या व्यक्तीने एक बातमी शेअर केली. हत्येपूर्वी कॅब चालकाला ‘जय श्रीराम’चा घोष करण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात वेगळेच सत्य समोर आले. वास्तविक, हे प्रकरण धार्मिक नव्हते. बुलंदशहरमध्ये बुकिंग सोडल्यानंतर कॅबचालक आफताब परत येत असताना काही असामाजिक घटक बुकिंग न करता टॅक्सीमध्ये बसले. मग सर्व वाद झाला.

राजस्थानच्या ऑटोचालकाचा आरोप खोटा ठरला

राजस्थानच्या सीकरमधील एका ऑटो चालकाचा आरोप होता की, त्याला जबरदस्तीने ‘जय श्री राम’ आणि ‘मोदी जिंदाबाद’ म्हणायला लावले. जनसत्ता, आज तक आणि नवभारत टाईम्स यांच्यासह अनेक माध्यमांनी या वृत्ताला प्रकाशित केले. सत्य हे होते की, आरोपीने त्याला जर्दा विचारला होता. यानंतर बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी ऑटोचालकाचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. आरोपी दारूच्या नशेत होते आणि यापूर्वीही दरोड्याच्या घटनांमध्ये सामील होते.

ज्या नेपाळीचे डोके मुंडण करून जय श्रीराम लिहिले, तो निघाला भारतीय, हजार रुपयांसाठी केला व्हिडिओ शूट

वाराणसीत, ज्या व्यक्तीचे जबरदस्तीने मुंडण केले होते आणि त्यावर ‘जय श्री राम’ लिहिलेले होते, ती व्यक्ती भारतीय निघाली. परंतु माध्यमांनी असे वृत्त दिले की, तो माणूस नेपाळी असून त्याला मुंडण करायला लावले आणि त्याला नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्याविरोधात घोषणा द्यायला लावल्या. त्याच्या डोक्यावर ‘जय श्रीराम’ लिहिण्यात आले होते. वाराणसी पोलिसांनी स्वतः सांगितले की, या व्यक्तीने 1000 रुपये घेऊन नेपाळी असल्याचे सांगितले होते. काही जणांनी त्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी आमिष दिले होते.

या घटनेवर एसएसपी अमित पाठक यांनी व्हिडिओतील नेपाळी व्यक्ती म्हणून दाखवण्यात आलेली व्यक्ती मूळ भारतीय असल्याचा खुलासा केला. धर्मेंद्र भारतीय असे त्याचे नाव आहे. साडीच्या दुकानात काम करणार्‍या धर्मेंद्रच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत काही जणांनी त्याला आमिष दाखवून व्हिडिओ शूट करण्यासाठी हे सर्व नाटक तयार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

गोध्रातील ‘जय श्रीराम’ न म्हणणाऱ्या मुस्लिम तरुणाच्या मारहाणीचे वृत्त खोटे ठरले

दिल्लीचे रहिवासी मोहम्मद कामिलने आरोप केला होता की, त्याच्या भावाला फक्त जय श्रीराम न जयघोष करण्यासाठी दबाव आणल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर दिल्ली पोलिसांनी अॅक्शन घेत पीडित तरुणाची चौकशी केली. यात कळले की, ही घटना म्हणजे धार्मिक वाद नसून दोन तरुणांतील वैयक्तिक भांडण होते. परंतु याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू होता.

काही माध्यमांनी मात्र क्रॉप व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, झारखंडच्या भाजपा सरकारमधील मंत्री सी.पी. सिंग यांनी कॉंग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांना जय श्री रामचा घोष करण्यास भाग पाडले. हे अर्धसत्य होते. भाजपच्या नेत्याला खलनायकाच्या रूपाने प्रोजेक्ट करण्यासाठी माध्यमांनी मुद्दाम संपूर्ण व्हिडिओचा एकच भाग दाखविला. व्हिडिओचा सुरुवातीचा भाग पाहून कळते की, सीपी सिंह जय श्रीराम घोषणेवरील कॉंग्रेसच्या आमदारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत होते.

खालिदने केली आत्महत्या केली, माध्यमांनी खोटी बातमी दिली

आज तक आणि इंडिया टुडेने बातमी दिली होती की, उत्तर प्रदेशच्या चंदौली गावात जय श्रीराम न म्हटल्याने खालिदला जाळण्यात आले. परंतु चांदौलीचे एसपी संतोषकुमार सिंग यांनी याबाबत निवेदन जारी करत म्हटले आहे की, पोलिसांना खालिदच्या जबाबात विरोधाभास आढळला. ते म्हणाले की, एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार खालिदला कोणीही आग लावली नव्हती, त्याने स्वत:ला पेटवून घेतले होते.

ते म्हणाले की, मुलगा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी उत्तरे देत आहे, त्यावरून जणू एखाद्याने त्याला या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत असे दिसते. एसपी म्हणाले की, तो मुलगा ज्या दोन गावांबद्दल बोलत आहे ते वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि ज्या ठिकाणाबद्दल तो बोलत आहे, ते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही नाही. यावरून हे स्पष्ट होते की, खालिद कुणीतरी शिकवल्यावरून हे विधान करत आहेत.

औरंगाबाद : शेख आमेरने समाजात नाव गाजवण्यासाठी खोटे सांगितले

आझाद चौक ते बजरंग चौक जात असताना शेख आमेरचा कार चालकाशी किरकोळ वाद झाला. आमरने त्याला धडा शिकवण्याचा विचार केला आणि त्याच दिवशी शहरातील हडको कॉर्नर येथे घडलेल्या घटनेची आठवण करून जय श्रीराम न बोलल्याबद्दल मारहाण केल्याची खोटी कहाणी रचून पोलिसांत तक्रार दिली.

तथापि, आमेरने तक्रार दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आपल्या वक्तव्यापासून माघार घेतली. आपल्या समाजात आपली उंची वाढवण्यासाठी आणि त्याच्याशी भांडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण कुभांड रचून पोलिसांकडे तक्रार केल्याचे कबूल केले.

औरंगाबाद : जमावाने सक्ती केली नाही

इम्रान इस्माईल पटेल यांनी असा दावा केला की रात्री घरी परत जाताना जमावाने त्यांना पकडून मारहाण केली आणि जय श्रीराम म्हणायला भाग पाडले. त्याचवेळी केवळ पोलीसच नव्हे तर इम्रानला वाचवणार्‍या प्रत्यक्षदर्शींनीही त्याच्या दाव्यास ठामपणे नकार दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैयक्तिक शत्रुत्वामुळे बाचाबाची झाली होती.

मुझफ्फरनगर : रामनाम घ्यायला लावलेच नाही

जेव्हा इमाम इम्लाकुर रहमान मुजफ्फरनगरला मारहाणप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले तेव्हा या प्रकरणात ना जय श्रीराम होते, ना दाढी ओढल्याची बाब त्यांनी एफआयआरमध्ये सांगितली. परंतु जेव्हा तो एफआयआर पूर्ण करण्यासाठी बागपत येथे (जेथील हे प्रकरण आहे) पोहोचले, तेव्हा या सर्व गोष्टी बागपतच्या एफआयआरमध्ये जोडल्या गेल्या. एसपींनी केवळ त्या फेटाळल्याच नाही, तर जाणूनबुजून धार्मिक अँगल जोडल्याची शक्यता व्यक्त केली. प्रकरणात त्वरित कारवाई होण्यासाठी असे करण्यात आले असावे.

उन्नाव : शुक्रवारपर्यंत तुम्ही काझी साहेबांचे ऐकले नाही तर…

स्थानिक मुलांशी क्रिकेट खेळण्यावरून भांडण झाल्यामुळे मदरशाच्या मुलांनी काझी निसार मिसबाहीकडे संपर्क साधला, तेव्हा काझी साहेब स्वत: खोटे ठरले. त्यांनी मदरशाच्या मुलांना जय श्रीराम जबरदस्तीने म्हणायला लावल्याचे कथानक जोडले, शिवाय धमकीही दिली की जर त्यांनी नमूद केलेले चार आरोपी ‘एकाच वेळी पकडले गेले नाहीत तर’ जी अॅक्शन कुठेही झाली नाही, ती होईल.

पोलिसांच्या तपासणीत या घटनेत धार्मिक रंग नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नाही, स्वत: राज्याच्या मुख्य माहिती सचिवांना या प्रकरणावर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली.

कानपूर : नशेत झालेल्या भांडणावर खोटे सांगितले

ऑटो चालक आतिब हल्ला झाला, विटा फेकल्या आणि दगडफेक केली. परंतु इथेही त्याला जय श्रीरामचा घोष करण्यास भाग पाडल्याची चर्चा खोटी ठरली. पोलिसांच्या तपासानुसार, दारूच्या नशेत हे भांडण झाले होते. वाद वाढल्यावर आतिबला शौचालयात बांधून मारहाण करण्यात आला.

कूच बिहार : आप्सी मियाँची करणी हिंदूंच्या माथ्यावर

आप्सी मियांने असगर याला कान पकडून उठाबशा काढायला आणि जय श्रीराम म्हणायला भाग पाडले. यावर लिबरल गँगने हिंदूंना जबाबदार ठरवण्यात जराही वेळ दवडला नाही. कूच बिहार पश्चिम बंगालमध्ये असल्याचेही त्यांनी लक्षात घेतले नाही – जेथे जय श्रीराम हिंदूंनीही म्हटले तर गोळ्या घातल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत हिंदू जय श्रीराम इतर धर्मीयाला म्हणायला लावतील तरी का?

दिल्ली : प्रत्यक्षदर्शींनी मोमीनचे आरोप फेटाळले

सेक्टर-20 मधील रोहिणी येथील मदरशामध्ये शिकवणारे मोहम्मद मोमीन यांनी असा आरोप केला की, त्यांनी जय श्री राम म्हणण्यास नकार दिल्यावर काही जणांनी त्यांच्या कारला धडक दिली. पोलिसांनी तपास केला, पण एकाही प्रत्यक्षदर्शीने मोमीनच्या आरोपांना समर्थन दिले नाही. घटनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरूनही या आरोपांची पुष्टी झालेली नाही.

करीमनगर : मजनूची मारहाण बनले ‘जय श्री राम’

‘मजलिस बचाओ’शी संबंधित अमजद उल्ला खान यांनी असा दावा केला की, भाजप-संघातील लोकांनी दुसर्‍या समाजातील किशोरवयीन मुलाला मारहाण केली, कारण त्याने जय श्रीराम म्हणायला नकार दिला. करीमनगरच्या आयुक्तांनी स्पष्ट केले की, पोलीस तपासात आढळले की असे काही घडले नाही. वैयक्तिक कारणांमुळे वाद झाला. या मुलाला मुलीच्या बाजूने असलेल्या लोकांनी छळ केल्याबद्दल मारहाण केली होती. एवढेच नाही तर मारहाण झालेल्या मुलाने आपल्या मुलाची चूक लक्षात घेत माफी मागितली.

गुरुग्राम : बरकतचा दावा ठरला खोटा

मोहम्मद बरकतने दावा केला होता की, गुरुग्राममधील काही हिंदूंनी त्यांना घेरले, त्यांची इस्लामिक गोल टोपी फेकली. त्यांना ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडले. यानंतर गुरुग्राम पोलिसांनी कारवाईत 15 जणांना ताब्यात घेतले, सुमारे 50 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि शेवटी असा निष्कर्षापर्यंत पोहोचले की बरकत अली यांना मारहाण केली गेली, परंतु त्यांची टोपी कोणीही फेकली नाही. त्यांना जय श्रीराम म्हणण्यासही भाग पाडले नाही. इतकेच नव्हे, तर ‘स्वराज’चे वार्ताहर स्वाती चतुर्वेदींच्या चौकशीत संशयाची सुईदेखील बरकतकडे वळली. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला.

गुन्हेगारी घटनेला धार्मिक वळण

जून 2017 मध्ये राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील लोकांच्या एका गटाने चेहेरा लपवून काही लोकांना कॅमेर्‍यावर शिवीगाळ केली आणि एका महिलेला प्लास्टिक पाइपने मारले. जबरदस्तीने धार्मिक घोषणाबाजी करण्यासाठी दबाव आणला. ही घटना कुणी नोंदवली आहे, हे समजू शकले नाही, परंतु व्हिडिओमध्ये असे दिसून आले की लोक महिलेला ‘अल्लाह’ आणि ‘जय श्री राम’चा घोष करण्यास भाग पाडत आहेत. या घटनेतही माध्यमांनी सोयीस्करपणे ‘अल्लाह’च्या भागाकडे दुर्लक्ष केले आणि संपूर्ण घटनेला धार्मिक वळण देण्यासाठी फक्त ‘जय श्रीराम’वर लक्ष केंद्रित केले. ही घटना पूर्णपणे गुन्हेगारीची होती, धार्मिक वळणाशिवायही अत्यंत क्रूर होती.

18 incidents found false claim of jai shri ram leftist media narrative mob lynching

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात