डॉक्टरांचे हात पाय बांधून लोणावळ्यात ७० लाखांचा दरोडा, शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवले ओलिस


डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते.  Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied


प्रतिनिधी

पुणे : डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते.

लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला.

पहाटेच्या सुमारास डॉ खंडेलवाल यांच्या पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी उघडून सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रासह आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डॉ खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. घरातील सर्व रोख रक्कम आणि सोने असा ऐवज त्यांनी लुटून नेला. सुमारे अर्धा तास दरोडेखोर त्यांच्या घरात होते.

50 लाख रुपये रोख आणि 16 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने असा एकूण 66 लाख 77 हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर हे सहा दरोडेखोर गच्चीवरुन चादर बांधत उतरुन पसार झाले. दरोडेखोर हे रस्सीने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था