हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम ; राज्यात ८० कोटी रुपयांचा दंड वसूल

वृत्तसंस्था

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र ट्रॅफिक विभागाकडून मोठी कारवाई सुरू आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ८० कोटी दंड वसूल केले आहेत. यामध्ये हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.. Punekar first in not wearing a helmet

दुचाकी अपघातामध्ये जीव वाचावा, म्हणून हेल्मेट सक्ती लागू आहे. मात्र, हेल्मेट न घालणाऱ्यामध्ये पुणेकर पहिल्या तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
जानेवारीपासून ते मे पर्यंत महाराष्ट्र हायवे ट्राफिक विभागाने नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. पहिल्या 5 महिन्यात 16.15 लाख लोकांना हेल्मेट घातले नसल्यामुळे दंड ठोठावला. 80 कोटी रुपये दंड म्हणून वसूल झाला आहे.

पुण्यात सर्वाधिक दंड वसुली

  • पुण्यामध्ये ७.४५ लाख लोकांना दंड
  • मुंबईमध्ये ३.९ लाखांवर लोकांना दंड
  • ठाण्यात ७८६४६ लोकांना दंड ठोठावला

दुचाकी अपघातात ४८७८जणांचा बळी

गेल्या वर्षी महाराष्ट्रमध्ये ४८७८ लोकांचे जीव दुचाकी अपघातात गेले होते. या मध्ये १५१० जणांचा जीव दुचाकीवर पाठीमागे बसलेल्यांचा गेला आहे. या अपघातात बहुतांश लोकांनी हेल्मेट घातले नव्हते.

Punekar first in not wearing a helmet

महत्त्वाच्या बातम्या