लोकसभा जिंकण्यासाठी देशात सर्वाधिक खर्च केला तो शशी थरुर यांनी…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (२०१९) उमेदवारांनी पाण्यासारखा पैसे खर्च करून विजय मिळविल्याचे उघड झाले. सर्व उमेदवारांनी तब्बल ७७५ कोटी रुपये खर्च केले असून त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांनी सर्वाधिक रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. Shashi Tharoor squanders Rs 69.94 lakh; Struggle for victory in Lok Sabha elections

निवडणूक आयोगाने नुकताच २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची आकडेवारी जाहीर केली. त्या मध्येबप्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार उमेदवारांनी ही ७० लाख रुपयांची रक्कम काठोकाठ खर्च केली आहे. खर्चामध्ये सर्वाधिक रक्कम शशी थरूर यांनी ६९.९४ लाख. त्या पाठोपाठ भाजपचे तीर्थसिंग रावत यांनी ६९.८५ लाख रुपये खर्च केले. केरळातील मुस्लिम लीगचे उमेदवार पी. के. कुंहलीकुट्टी यांनी ६९.८२ लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे हरियाणातील फरीदाबाद येथील मतदार संघात एकूण सर्व उमेदवारांनी सर्वाधिक २.९१ कोटी खर्च केला तर उत्तर गोव्यात सर्वाधिक कमी ५४.८४ लाख खर्च झाला. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात १५८.४२ रुपये प्रति मतदारांवर खर्च केल्याचे आयोगाने म्हंटले आहे. सर्वात कमी खर्च हा मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे झाला. येथील प्रत्येक मतदारावर ४.९१ रुपये खर्च केला आहे.



उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांची नावे जशी जाहीर केली. तशीच कमी खर्च करणारे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये सिक्कीममधील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे इंद्र हुंग सुब्बा यांनी ७ लाख रुपये खर्च केले आहेत. सिक्कीम, गोवा आणि अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्ये असल्यामुळे तेथील उमेदवारांना ५४ लाख रुपये खर्च करण्यास परवानगी होती.

लोकसभेच्या ५४३ जागांवर ८५०४ उमेदवार उभे राहिले होते. त्यांनी ७७५ कोटींचा खर्च निवडणुकीत केला आहे. अमेठी आणि रायबरेली येथे मतदारांवर कमी रक्कम खर्च झाली. राहुल गांधी आणि स्मृती इराणी सह उमेदवारांनी ८०.७५ लाख रुपये खर्च केले. प्रति मतदार विचार करता हा खर्च ८.५६ ४
रुपये आहे. सोनिया गांधींच्या रायबरेलीत हा ८.२६ रुपये खर्च झाला. एकूण उमेदवारांनी ७९.२० लाख खर्च केले आहेत.

Shashi Tharoor squanders Rs 69.94 lakh; Struggle for victory in Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात