आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार


वृत्तसंस्था

हैद्रराबाद : आंध्र प्रदेशातील कोय्युरू या भागातील तिगालमेट्टाच्या जंगलात बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओअिस्ट) या संघटनेचे ते सदस्य होते. Six Maoists killed in clashes with police in Andhra Pradesh

तिगालमेट्टाच्या जंगलात आंध्र प्रदेश पोलिसांनी माओवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली होती. तेव्हा चकमक उडाली. पोलिसांनी एके-४७ रायफल, एक कार्बाइन, ३०३ रायफली, एक स्वदेशी बंदूक, यासह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीत माओवाद्यांपैकी किती जखमी झाले, याचा तपशील नाही.


नक्षलवादी कोरोनाचे शिकार ; १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ; बस्तर जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव


ठार झालेल्या सहा माओवाद्यांची ओळख पटलेली नाही. माओवाद्यां नेता मुत्तनगरी रेड्डी याने एप्रिल महिन्यात आंध्र प्रदेश पोलिस महासंचालकांसमोर शरणागती पत्करली होती.त्याच्यावर २० लाख रुपयांचे इनाम होते. त्यानंतर आणखी काही माओवादी नेते पोलिसांना शरण येणार, अशी चर्चा होती. नेमके त्याच वेळेस आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी चकमक होऊन काही माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. माओवाद्यांचा एक नेता गजरला रवी ऊर्फ उदय याने आता आंध्र प्रदेश- ओडिशाच्या सीमेवरील भागात पुन्हा सक्रिय झाला आहे. मागील वर्षभर रवी हा छत्तीसगढमधील जंगलात लपून बसला होता. आता त्याला पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.

माओवादी म्होरके पळाले ?

आंध्र प्रदेशमध्ये चकमक सुरू असताना माओवाद्यांचे म्होरके तिथून पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिस हेलिकॉप्टरने शोध घेत  आहेत.

Six Maoists killed in clashes with police in Andhra Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात