सावध राहा, चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी, यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात या ५ वर्षात खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.Beware, if you make a mistake, it will not take long for all the hard work to become water, UP will become Kashmir, Bengal and Kerala, warns Yogi Adityanath

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुमारे ६ मिनिटांचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारने गेल्या ५ वर्षात जे काही केले आहे ते मोठ्या बांधिलकीने केले आहे आणि जे काही सांगितले आहे, ते तुमच्यावर विश्वास ठेवून केले आहे.



या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सर्व काही पाहिले आणि लक्षपूर्वक ऐकले. मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या ५ वर्षांत खूप काही घडले. उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये २४ तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल.

मी इथे मत मागायला आलो नाही. पण ७० वर्षात हे काम पूर्वीच्या सरकारांना करता आले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आम्ही घरोघरी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये बांधली, तुमची मते मिळवण्यासाठी हा माझा जुगाडही नव्हता. स्वच्छतेपेक्षाही माझ्यासाठी माता-भगिनींच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता. प्रथमच लाखो घरे व कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. त्यांच्या डोळ्यातील चमक अतिशय बोलकी आहे. यापुढे शेकडो निवडणुकांतील विजयाही फिका आहे.

योगी आदित्यनाथ म्हणतात, निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आजपर्यंत धुरकट चुलीवर काम करणाºया आमच्या माता-भगिनी आता आजारी पडणार नाहीत, निरोगी असतील. आयुष्मान योजना आज उत्तर प्रदेशातील कोट्यवधी कुटुंबांसाठी आजारांना तोंड देण्यासाठी आधार बनली आहे.

‘हर घर नल’ योजनेच्या माध्यमातून आम्ही घराघरात पाणी पुरवठा करत आहोत. एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात द्रुतगती मार्ग टाकत आहोत, राज्यभर औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे तुम्ही पाहिले आहे.

२ वर्षांपूर्वी करोना व्हायरसच्या भयंकर महामारीने थैमान घातले आहे. सर्वात मोठे श्रीमंत आणि प्रगत देश देखील हतबल दिसले. जगभर हाहाकार माजला. लोकं रोगाने नाही पण उपासमारीने नक्कीच मरतील, असे वाटत होते. पण उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही कोट्यवधी कुटुंबांना रेशन द्यायला सुरवात केली, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी सरकारने केलेली कामे सांगितली आहेत.

Beware, if you make a mistake, it will not take long for all the hard work to become water, UP will become Kashmir, Bengal and Kerala, warns Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात