HIJAB CONTROVERSY :डावे-उदारमतवादी – इस्लामिक कट्टरपंथी आणि तालिबान साथ साथ – शाळेत बुरखा घातलेल्या मुलींना पाठिंबा ! म्हणे इस्लामिक मूल्ये कोणत्याही राष्ट्रीय संस्कृतीपेक्षा मोठी


न्यायालयाने निर्णय दिला असताना, ‘डावे-उदारमतवादी’ आणि इस्लामिक कट्टरपंथी मुस्लिम मुलींना समान ड्रेस कोडच्या प्रस्थापित नियमांचे उल्लंघन करण्यासाठी समर्थन आणि चिथावणी देत ​​आहेत.Taliban supports Karnataka burqa girls, praises their love for hijab and says Islamic values are bigger than any national culture

 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:कर्नाटकातील हिजाबचा वाद वाढतच आहे . हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तरीही हा वाद कायम आहे .गोष्ट छोटी आहे शाळेत एक नियम असतो त्यानुसार गणवेश परिधान करावा लागतो मात्र तथाकथित डावे उदारमतवादी – मुस्लिम कट्टरपंथी आणि तालिबान यांना स्त्रिया झाकून ठेवाव्यात असे वाटते .या वादात उडी घेत तालिबानने म्हंटले आहे की इस्लामिक मूल्ये कोणत्याही राष्ट्रीय संस्कृतीपेक्षा मोठी आहेत.Taliban supports Karnataka burqa girls, praises their love for hijab and says Islamic values are bigger than any national culture

तालिबानची विचारसरणी मागच्या वर्षी अफगाणिस्तान मध्ये हिजाब अनिवार्य केल्यावरच स्पष्ट झाली होती .महिलांच्या हक्कांवर दडपशाही करून, त्यांनी दूरचित्रवाणींना महिला कलाकारांचे कार्यक्रम प्रसारित करणे थांबवण्याचे आदेश दिले होते आणि महिला लेखकांनी स्वतःला झाकले पाहिजे असा पुनरुच्चार केला होता.


दरम्यान, हिजाबच्या वादात तालिबानने उडी घेत हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम मुलींना त्यांनी पाठिंबा दिला आहे. कर्नाटकातील (Karnataka) मुस्लिम मुलींचे कौतुक करताना तालिबानने (Taliban) म्हटले की, ‘या मुली इस्लामिक मूल्यांसाठी झगडत आहेत.’

दरम्यान, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इस्लामिक अमिरातीचे प्रवक्ते इनामुल्ला समंगानी यांनी ट्विट करत म्हटले की, “हिजाबसाठी भारतीय मुस्लिम मुलींचा संघर्ष हे दर्शवितो की हिजाब ही केवळ अरब, इराण (Iran) आणि पाकिस्तानची (Pakistan) संस्कृती नसून एक इस्लामिक मूल्य आहे.” ज्यासाठी जगभरातील मुस्लिम मुली वेगवेगळ्या प्रकारे बलिदान देतात आणि त्यांच्या धार्मिक मूल्याचे रक्षण करतात

बुरखा घातलेल्या मुलीचे कौतुक

कर्नाटकातील एका मुलीचा बुरखा घातलेला फोटोही सामानानी यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. अल्लाहू अकबर बोलताना या मुलीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बुरख्यामधील मुलीचे अनेक वरिष्ठ तालिबान अधिकाऱ्यांकडून कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले. बुरख्यासाठी लढणाऱ्या या मुलींना तालिबान पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी तालिबानच्या प्रवक्त्याने पाकिस्तानच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी यूजरने लिहिले की, कर्नाटकातील मुस्लिम मुली धर्मनिरपेक्षतेसाठी लढत आहेत. ज्यानंतर सामागानी लिहिले की, ते बनावट धर्मनिरपेक्षतावादी आहेत, कारण ते हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या मुलींना सेक्युलर म्हणत इस्लामशी वैर दाखवत आहेत.

तालिबानने सत्तेत येताच महिलांना हिजाब घालणे अनिवार्य केले. त्याचबरोबर महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करत तालिबानने महिला कलाकारांना टीव्ही शोमध्ये काम करण्यापासून रोखले आहे. त्यांनी महिलांना नेहमी बुरख्यामध्ये ठेवण्याचा आदेश दिला. यानंतर अफगाणिस्तानातील अनेक महिलांनी हिजाबच्या नियमाला विरोध केला.

कर्नाटकात 1 जानेवारीपासून हिजाबवरुन वाद सुरु झाला आहे. जेव्हा एका शैक्षणिक संस्थेत 6 मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यास नकार देण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाने हिजाब घालणे कॉलेजच्या ड्रेस नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला.

मुलींना ड्रेस कोड पाळावा आणि वर्गात हजेरी लावावी यासाठी कॉलेजचे अधिकारी काही आठवड्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु मुलींनी वर्गात हिजाब घालण्यावर ठाम आहेत, कॉलेजने त्यांना ड्रेस कोडमधून सूट देण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयाने सांगितले आहे की त्यांच्याकडे १०० हून अधिक मुस्लिम विद्यार्थी आहेत परंतु केवळ 8 विशिष्ट मुली आहेत, ज्यांनी यापूर्वी कधीही हिजाब घातला नाही, ज्यांना आता अचानक वर्गात हिजाब घालायचा आहे.

हिंदू विद्यार्थी हिजाबच्या मागणीवर आक्षेप घेत आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की जर कॉलेजने हिजाबला परवानगी दिली तर ते वर्गातही भगवी शाल घालू लागतील.

Taliban supports Karnataka burqa girls, praises their love for hijab and says Islamic values are bigger than any national culture

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात