नाशिक : एकीकडे शौचालय घोटाळ्यात अडकलेले साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि दुसरीकडे साखर कारखाना कर्ज थकबाकीत अडकलेले अभिजीत पाटील शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार राजकीय गर्तेमध्ये पूर्ण खोलवर अडकल्यानंतर त्यांना हात देऊन बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्याऐवजी शरद पवारांनी नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आहे, पण या दोन्ही शिलेदारांना वाचवण्याची पवारांची क्षमता का नाही??, असा सवाल त्यामुळे तयार झाला आहे. शिवाय आपले शिलेदार शौचालय घोटाळा किंवा साखर घोटाळ्यात अडकताना पवार काय करत होते??, काही तितकाच कळीचा सवाल आहे.Why sharad pawar is unable to save his colleagues trapped in toilet and sugar scams??
एक तर शरद पवारांना साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरुद्ध “तगडा” उमेदवार सापडत नव्हता. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पवारांनी भरपूर वेळ घेतला. वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केली आणि अखेरीस शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यांनी प्रचार देखील सुरू केला, पण त्यांचा जुना शौचालय घोटाळा समोर आला. शौचालय घोटाळ्यात शशिकांत शिंदे यांना 2 महिन्यांपूर्वी जामीन मिळाला आहे, पण आता पोलिसांनी नवी मुंबई मार्केट कमिटीच्या आणखी एका घोटाळ्यात शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केल्याने ते कायदेशीर पातळीवर अडचणीत आले आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकण्याची बातमी आल्यावर पवार चिडले आणि त्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली.
– कुठे गेली चाणक्यगिरी??
पण ही महाराष्ट्र पेटण्याची भाषा करण्यापूर्वी शशिकांत शिंदे गेल्या कित्येक महिन्यांपासून शौचालयापासून मार्केट कमिटीच्या अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेत हे पवारांना माहिती नव्हते का??, तसे माहिती असेल, तर पवारांनी शशिकांत शिंदे यांना त्या घोटाळ्यापासून वाचवण्यासाठी नेमके काय केले?? आपली तथाकथित “चाणक्यगिरी” पणाला लावून शशिकांत शिंदे यांना शौचालय घोटाळ्यातून क्लीन चिटका मिळवून दिली नाही??, की ते देऊ शकले नाहीत??, तिथे पवारांची क्षमता कमी पडली का?? अशा एकापाठोपाठ एक सवालांची मालिका तयार झाली, पण या सवालांची उत्तरे मिळत नाही. जे उत्तर मिळाले, ते पवारांच्या तोंडून बाहेर आले आणि ते महाराष्ट्र पेटण्याच्या भाषेचे होते.
आता पवारांच्या दृष्टीने महाराष्ट्र पेटणार म्हणजे कुठला महाराष्ट्र पेटणार?? मूळात अख्खा महाराष्ट्र पवारांच्या शब्दावर पेटण्याएवढा छोटा राहिलाय का??, आणि राहिलाच असेल, तर तो पवारांच्या बारामती, माढा पुरताच किंवा अगदी थोडाफार साताऱ्यापुरताच उरला आहे, हे आजचे वास्तव आहे. पण हे झाले, शशिकांत शिंदे यांच्या शौचालय आणि अन्य घोटाळ्यापुरते!!
दुसरीकडे पंढरपुरात शरद पवारांचे दुसरे समर्थक अभिजीत पाटील साखर घोटाळ्यात अडकले. त्यांनी 432 कोटी रुपयांची राज्य सहकारी बँकेची थकबाकी थकवली. त्यामुळे बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सील गोदामाला ठोकले. त्या गोदामात तब्बल 1 लाख पोती साखर शिल्लक आहे. आता या थकबाकी प्रकरणातून सुटायचे असेल, तर किमान 25 % रक्कम भरणे अपेक्षित आहे. याचा अर्थ अभिजीत पाटलांना आज 100 कोटी रुपयांची गरज आहे. मग हे 100 कोटी रुपये शरद पवार का मिळवून देत नाहीत??, त्यांची मुंबईपासून दिल्लीपर्यंतची सगळी राजकीय आणि आर्थिक कनेक्शन्स वापरून पवारांनी 100 कोटी रुपये मिळवून दिले, अभिजीत पाटलांची संकटातून सुटका होणार आहे. पण अभिजीत पाटलांनी तर पवारांशी सल्लामसलत करून भाजपचा रस्ता धरण्याचे निश्चित केल्याची बातमी समोर आली आहे.
फडणवीसांना साकडे घालायची अभिजीत पाटलांवर वेळ
कारण शरद पवार आपल्याला मदत करू शकत नाहीत, हे पाहिल्यानंतर अभिजीत पाटलांवर अखेरीस देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालायची वेळ आली आहे. अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकी प्रकरणातून आपल्याला वाचवण्याची विनंती करणार आहेत. मग देवेंद्र फडणवीस अभिजीत पाटलांची ही विनंती कुठली तरी राजकीय किंमत वसूल करूनच मान्य करणार ना?? की अभिजीत पाटील त्यांना हवे तसे पवारांचे काम करत राहणार आणि मदत मात्र फडणवीस करणार, असे घडणार आहे??, हा कळीचा सवाल आहे.
शशिकांत शिंदे यांचा शौचालय घोटाळा असो किंवा अभिजीत पाटलांचा साखर कारखाना थकबाकीचा घोटाळा असो, या दोन्हींचे वर्णन मराठी माध्यमांनी “पवारांचे शिलेदार अडचणीत, ऐन निवडणुकीत कोंडीत” अशा शब्दांनी केले आहे. पण मूळात पवारांचे शिलेदार अडचणीतच का आले??, त्यांनी घोटाळे का केले आणि ते घोटाळे करत असताना पवार गप्प का बसले?? घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या शिलेदारांना पवार सोडवू का शकत नाहीत??, की पवारांची आपल्या शिलेदारांना संकटातून सोडवण्याची इच्छा आणि क्षमताच नाही??, हे सवाल मराठी माध्यमांनी विचारले नाहीत. त्यांनी फक्त ऐन निवडणुकीत पवारांच्या शिलेदारांची कोंडी झाल्याच्या एकतर्फी बातम्या चालविल्या, पण घोटाळे होताना पवार गप्प बसले आणि आता शिलेदार अडकल्यानंतर महाराष्ट्र पेटण्याची भाषा कर्ते झाले, हे मात्र मराठी माध्यमांनी या एकतर्फी बातम्यांमधून दडपून ठेवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App