प्रतिनिधी
सातारा : दस्तुरखुद्द शरद पवार यांचा फोन जाऊनही राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाला. या पराभवावर स्वतः शशिकांत शिंदे नाराज आहेतच पण आज स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन त्यांच्याशी शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड चर्चा करून पराभवाची कारणमीमांसा समजून घेतली.Sharad Pawar upset after defeat of Shashikant Shinde
त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदी नेत्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. सातारा जिल्हा बँकेचा चार जागा राष्ट्रवादीच्या हातून गेल्या. शशिकांत शिंदे यांच्यासारख्या मोहऱ्याचा पराभव झाला. या विषयी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव ;सातारा बँकेच्या निवडणूक मातमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक
एवढेच नाही तर शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर ट त्यांच्या समर्थकांनी थेट सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून दगडफेक केली. राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे वातावरण राजकीयदृष्ट्या खराब झाल्याचे लक्षात आले. शरद पवार यांनी लगेच आपला कराड दौरा थोडा थांबून सातारा विश्रामगृहात सर्व नेत्यांची चर्चा करून डँमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले.
– शरद पवारांचा फोन, तरीही शशिकांत शिंदे पराभव; हे घडले कसे?
– राजकीय वर्तुळात चर्चा
जावळी सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँकेवर निवडून आणण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांना फोन केले होते. स्वतः शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने दोन्ही आमदारांनी जावळी सोसायटीच्या मतदारांना शशिकांत शिंदे यांच्यासाठी साकडे घातले होते. सरकार नामा या वेब पोर्टलने या संदर्भातली बातमी दिली होती.
मात्र आता शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे निवडून आले. आहेत. त्यामुळे हे नेमके कसे घडले?, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. स्वतः शशिकांत शिंदे यांनी आपण शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागतो असे म्हटले आहे.
परंतु, दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातलेल्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाच कसा?, हा विषय सध्या साताऱ्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. पवारांनी स्वतः फोन करूनही मतदारांवर प्रभाव पडला नाही की त्यांच्या फोनची अन्य काही कारणे आहेत अशी दबक्या आवाजात राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक सुरुवातीपासूनच मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून जिल्ह्याच्या राजकारणात बराच खल झाला होता. त्यांच्या उमेदवारीचे शरद पवार यांच्यापर्यंत ते प्रकरण गेले होते. परंतु जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपापसात राजकीय पॅचअप करून ११ जागा बिनविरोध केल्या. त्यात उदयनराजे यांचाही नंबर होता. परंतु निवडणूक झाली त्या जागांमध्ये मात्र जावळी सोसायटी मतदार संघाची जागा होती. त्या जागेवर शशिकांत शिंदे यांचा एक एका मताने पराभव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App