विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (आप) कॉँग्रेसविरुध्द जोरदार मोहीम उघडली आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॉँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचा कचरा आम्हाला पक्षात घ्यायचा नाही. काँग्रेसचा कचरा पक्षात घेण्यास सुरुवात केली,We don’t want Congress garbage, otherwise 25 MLAs will come to AAP by evening, Arvind Kejriwal’s attack
तर संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आम आदमी पक्षात सामील होतील.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पक्षातील काही लोक काँग्रेस पक्षात सामील झाल्याचे विचारल्यानंतर कॉँग्रेसवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, प्रत्येक पक्षात असे घडते की, ज्यांना तिकीट मिळत नाही, ते नाराज होतात. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो, काही लोक सहमत असतात तर काही नाराज होतात. काँग्रेसमधीलही अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांचा कचरा आम्हाला उचलायचा नाही. जर आम्ही त्यांचा कचरा उचलू लागलो,
तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात येतील. ही स्पर्धा करायची झाली तर आपल्यापैकी फक्त २ जण त्या पक्षात गेले आहेत. मी त्यांना आव्हान देत आहे,२५ आमदार आणि २-३ खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांना आपमध्ये यायचे आहे.
पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर केजरीवाल म्हणाले, निवडणूक जवळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाची घोषणा होते. मागच्या वेळी आठवडाभरापूर्वी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.
आजपर्यंत काँग्रेस पक्षाने ना सिद्धूजींचे नाव घेतले आहे ना चन्नी साहेबांचे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असतील हे माहीत नाही. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे माहीत नाही. गोव्यात माहीत नाही, अजून कोणीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे इतरांच्या आधी आम्ही घोषणा करू.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App