विशेष प्रतिनिधी
जयपूर : आगामी निवडणुकीमध्ये पक्षाच्या हातात पुन्हा सत्तानिश्चिती होण्यासाठी कोणतीही वेळ न दवडता तातडीने मला राजस्थानचा मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी काॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांच्याकडे केली. अन्यथा पंजाब सारखी अवस्था राजस्थानमध्ये होईल असा इशाराही दिला. A situation similar to Punjab will happen in RajasthanSachin Pilot warns Sonia Gandhi
पुढील वर्षी मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पायलट यांनी मागील काही आठवड्यात गांधी कुटुंबियांसोबत तीन वेळा चर्चा केली. यावेळी पायलट यांनी राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. मुख्यमंत्री बदलाचा निर्णय तत्काळ घेतला नाही
तर पंजाबमध्ये काॅंग्रेसची जी अवस्था झाली तशीच परिस्थिती पुन्हा अनुभवास मिळेल. जिथे चरणजीत सिंह चन्नी यांचा मुख्यमंत्री बनविण्याचा फाॅर्म्युला नापास ठरला. तशी अवस्था राजस्थानमध्ये होईल, असा इशारा पायलट यांनी पक्ष श्रेष्ठींना दिल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App