कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील ड्रग्स आयातदाराला ठोकल्या पंजाबमध्ये बेड्या!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरात मधील कांडला बंदरातील ड्रग्सचे कनेक्‍शन पंजाबमध्ये असल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणातल्या आयातदार पंजाब मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.Kandla port heroin case: Drug importer beaten up in Punjab

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्‍यांबरोबर संयुक्तपणे विकसित केलेल्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी सध्या कांडला बंदर इथे उत्तराखंडमधील कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करत आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ही खेप कांडला बंदरात आली होती. 17 कंटेनर (10,318 बॅग) मधून आयात केलेल्या मालाचे एकूण वजन 394 मेट्रिक टन भरले आणि ती “जिप्सम पावडर” असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत 1,439 कोटी रुपये किंमतीचे 205.6 किलो अवैध हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मालाची सखोल तपासणी अजूनही बंदरात सुरू आहे.

डीआरआयचे भारतभर छापे

तपासादरम्यान, आयातदार उत्तराखंडमधील नोंदणीकृत पत्त्यावर सापडला नाही. त्यामुळे आयातदाराला पकडण्यासाठी देशभरात मोहीम झाली. आयातदाराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डीआरआयने भारतभर विविध ठिकाणी छापे घातले. ओळख टाळण्यासाठी आयातदार सारखी ठिकाणे बदलून लपून राहात होता. मात्र अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि पंजाबमधील एका लहान गावात हा आयातदार सापडला. आयातदाराने प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्यामुळे.

ट्रान्झिट रिमांड मंजूर

आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे, डीआरआयने या आयातदाराला एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींअंतर्गत अटक केली आणि त्याला अमृतसरच्या विशेष दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांना या आयातदाराला भुज येथील न्यायालयासमोर हजर करता यावे यासाठी न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Kandla port heroin case: Drug importer beaten up in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात