वृत्तसंस्था
रायपूर : महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड ताजे असताना छत्तीसगडमध्ये नवे “एकनाथ शिंदे” राजकीय पटलावर प्रकट झाले आहेत. अर्थात तिथल्या शिवसेनेत नव्हे, तर काँग्रेसमध्ये!! छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस सरकारमधील ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी आपल्या खात्याचा राजीनामा दिला आहे. मात्र उर्वरित खाती त्यांनी स्वतःकडे कायम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. wrote a 4-page letter to the Chief Minister. S. Singhdev’s resignation from the post of Rural Development Panchayat Raj Minister
छत्तीसगढ़ के मंत्री टी.एस. सिंहदेव ने राज्य के पंचायत एवं ग्रामीण विकास मंत्री पद से इस्तीफा दिया। pic.twitter.com/8XjCgYBDm8 — ANI_HindiNews (@AHindinews) July 16, 2022
छत्तीसगढ़ के मंत्री टी.एस. सिंहदेव ने राज्य के पंचायत एवं ग्रामीण विकास मंत्री पद से इस्तीफा दिया। pic.twitter.com/8XjCgYBDm8
— ANI_HindiNews (@AHindinews) July 16, 2022
भूपेश बघेल यांच्याशी पटत नाही
टी. एस. सिंगदेव हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी त्यांचे राजकीय दृष्ट्या पटत नाही. महाराष्ट्रात जशी जसा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष रंगला होता, तसेच आश्वासन काँग्रेसमध्ये टी. एस. सिंगदेव यांना दिले होते, असे खुद्द त्यांचेच म्हणणे आहे. भूपेश बघेल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे अर्थातच टी. एस. सिंगदेव आपल्या पुढच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची वाट पाहत होते. परंतु काँग्रेस श्रेष्ठींनी अद्याप तरी त्यांचे ऐकले नसल्यामुळे अखेरीस त्यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिपदाचा नव्हे, तर ग्रामीण विकास आणि पंचायत राज या खात्याचा राजीनामा दिला आहे.
4 पानी राजीनामापत्र
हा राजीनामा त्यांना एका ओळीत देता आला असता परंतु त्यांनी तब्बल 4 पानी पत्र लिहून खात्याचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेकडे मुख्यमंत्र्यांचे होणारे दुर्लक्ष, ग्रामीण आणि पंचायती राज विभागात अधिकाऱ्यांचा परस्पर होणारा हस्तक्षेप, मंत्र्यांना न विचारता केलेल्या बदल्य, त्याचबरोबर आवश्यक निधी न देणे आदी मुद्दे आहेत. त्यामुळे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय यांचा कार्यभार सांभाळणे अवघड झाल्याने ते खाते आपण सोडून देत आहोत. बाकीच्या खात्यांचा म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण जीएसटी अंमलबजावणी या खात्यांचा कार्यभार आपण निष्ठेने संभाळू, असे टी. एस. सिंगदेव यांनी पत्रात नमूद केले आहे.
एकनाथ शिंदेंनीही राजीनामा दिला नव्हता
एकनाथ शिंदे यांच्या बंडाची ही छत्तीसगढी आवृत्ती दिसते आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा न देता बंड केले होते. किंबहुना त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या 7 पैकी कोणाही मंत्र्याने अखेरपर्यंत राजीनामा दिलेला नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार गडगडल्यानंतर आपोआपच शिंदे यांच्यासह बाकीच्यांची मंत्रिपदे गेली. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर आधीच्या मंत्रिमंडळातले 7 मंत्री होते आहेत. ते आता मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
सिंगदेव यांच्या समावेत किती मंत्री, आमदार?
छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा न देता फक्त त्यांच्याकडे असलेल्या एका खात्याचा राजीनामा दिला आहे. ही त्यांच्या राजकीय बंडाची सुरुवात तर नाही ना??, त्यांच्यासमवेत छत्तीसगड मधले किती मंत्री आणि आमदार येतील?? या सवालांची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App