शिंदे – फडणवीस लागलेत आपापल्या प्रचाराला; सुप्रियाताई – अजितदादा लावतायेत त्यांच्यात कलगीतुरा!!


विनायक ढेरे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करून महिना उलटत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पुढच्या राजकीय नियोजनानुसार कामाला देखील लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे घाई गर्दीत घेतलेले निर्णय ते धडाधड रद्द करत आहेत. Shinde Fadanavis are targeting opposition 200 votes; supriya sule and ajit Pawar targets them on secondary issues

एकीकडे या दोघांचे सरकार वेग पकडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र त्यांच्यात कलगीतुरा लावताना दिसत आहेत. मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे, तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपुढचा माईक खेचून घेतात. कधी त्यांना चिठ्ठ्या देतात. हे दोघेच सरकार चालवतायेत. मंत्रिमंडळाचा अजून पत्ता नाही, असे शरसंधान अजित पवारांनी साधले आहे. राष्ट्रवादीचे नेते तुलनेने दुय्यम मुद्द्यांवर शिंदे – फडणवीसांवर शरसंधान साधत असताना स्वतः हे दोन्ही नेते मात्र आपापल्या प्राधान्यक्रमानुसार काम करताना दिसत आहेत.

शिवसेना पक्ष दोन तृतीयांश फुटीच्या दिशेने

शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट ऐकत नाही हे पाहिल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची पक्ष बांधणी धीमेपणाने पण ठामपणाने सुरू ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविले आहे त्यांच्या नेमणुका शिंदे करत आहेत. नरेश म्हस्के यांची त्यांनी पुन्हा ठाणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. एक प्रकारे सुनियोजित पद्धतीने शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा हा प्रकार मानला जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांचे टप्प्याटप्प्याने शक्तिप्रदर्शन देखील सुरू आहे. या प्रत्येक शक्तिप्रदर्शनात एकनाथ शिंदे आपल्या गटाचे हळूहळू मजबुतीकरण करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे हे खरे पण त्या बैठकांमध्ये शिवसेनेचे सध्या पदावर नसलेले पदाधिकारीच उपस्थित राहत आहेत. त्यामुळे शिवसेना खऱ्या अर्थाने उभी फूट पडण्याच्या दिशेने चाललेली दिसत आहे.फडणवीसांच्या राज गाठीभेटी

शिंदे गटाचे असे एकीकडे राजकीय मजबुतीकरण होत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय भेटीगाठी घेताना चुकत नाहीत. राज ठाकरे यांच्याबरोबर आज दीड तास झालेली चर्चा आणि त्याचेच निदर्शक आहे. राज ठाकरे यांच्या समावेत पुढच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते. अर्थात राज ठाकरे पुन्हा राजकीय दृष्ट्या ॲक्टिव्ह झाल्यानंतर कोणते मुद्दे उचलतात आणि त्या मुद्द्यांना शिंदे – फडणवीस सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

सुप्रियांना वाटते शिंदेंची काळजी

विरोधकांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस यांना ज्या मुद्द्यांवर टार्गेट केले आहे ते म्हणजे माइक बाजूला करणे, चिठ्ठ्या देणे, उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ते कमी असल्याचे दाखवणे, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी “राजकीय काळजी” व्यक्त करणे असली वरवरची आहेत.

200 मतांचे टार्गेट

पण दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांनी राज्यसभा निवडणूक विधान परिषद निवडणूक अन्यथा राष्ट्रपती पदाची निवडणूक यामध्ये जास्तीत जास्त मते मिळवण्याचा मिळवण्याची व्युहरचना केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मते फोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. तोच प्रयोग पुन्हा विधान परिषदेत वाढवून करण्यात आला आणि आता तर शिंदे – फडणवीस यांनी एकत्रितरित्या द्रौपदी मुर्मू यांना 200 आमदारांची मते मिळवून देण्याचे टार्गेट ठेवले आहे. याचाच अर्थ असा की विरोधकांमध्ये न बोलता शांतपणे दोन तृतीयांश फूट पडण्याचा पाडण्याचाच हा डाव आहे आणि त्या गावाकडे शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि शिंदे फडणवीसांवर तोंडी तोफा डागताना दिसत आहेत.

संजय राऊत यांची अस्थानी टीका

संजय राऊत यांनी देखील याच प्रकारचे टीकास्त्र शिंदे फडणवीस सरकारवर सोडले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा निर्णय रद्द केला. त्यावरून हे सरकार हिंदुत्ववादी आहे, असा पोरकट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वास्तविक राज्यपालांनी तत्कालीन ठाकरे – पवार सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. तसा निर्णय घेता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्पष्ट केलेच होते. त्यामुळे तोच निर्णय पुन्हा घ्यावा लागेल आधीचा निर्णय रद्द ठरवावा लागेल, असे तेव्हाच ते म्हणाले होते. त्यानुसार आज शिंदे फडणवीस सरकारने नामांतराचा निर्णय रद्द केला. आता त्याबद्दल नव्याने प्रस्ताव मांडून औरंगाबाद, उस्मानाबाद दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय नव्याने घेता येईल. परंतु परंतु त्यातले राजकीय इंगीत समजूनही संजय राऊत आणि मात्र या सरकारला शिंदे फडणवीस सरकारला ते हिंदुत्ववादी नसल्याचा आरोप लावून घेतला आहे. जो प्रत्यक्षात काहीच दिवसात खोटा ठरणार आहे.

विरोधकांमध्ये दोन तृतीयांश फूट

याचा सरळ राजकीय अर्थ असा की शिंदे फडणवीस एकीकडे आपली राजकीय पोझिशन दिवसेंदिवस मजबूत करून संपूर्ण विरोधी पक्षांमध्येच दोन तृतीयांश फूट पाडण्याचा पाडण्याची योजना अमलात आणत असताना विरोधक मात्र शाब्दिक तोफा उडवण्याच्या पलीकडे काही करताना दिसत नाहीत!!

Shinde Fadanavis are targeting opposition 200 votes; supriya sule and ajit Pawar targets them on secondary issues

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण