श्रीलंकेतील घराणेशाहीवर शरद पवारांचा नागपुरातून प्रहार!!; पण सोशल मीडियातून राष्ट्रवादीच्या घराणेशाहीची खिल्ली!!

प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या नागपूर दौऱ्यात विविध राजकीय गाठीभेटी आणि बैठका घेतल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी श्रीलंकेतील घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार केला. Sharad Pawar’s attack on dynasticism in Sri Lanka from Nagpur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरताना शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार सध्या आपल्या देशावर हुकुमशाही लादत आहे. देशातल्या जनतेचे लोकशाही अधिकार हिरावून घेत आहे. आजच केंद्र सरकारने आदेश काढून संसद परिसरात आंदोलन करण्यास प्रतिबंध घातला आहे. संसदेच्या परिसर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर आंदोलन करण्याची विरोधी पक्षांची पद्धत असते. त्याला प्रतिबंध घातला आहे. ही सध्याच्या केंद्र सरकारची एकाधिकारशाही आहे. मात्र, ती फार काळ चालणार नाही.


UPA Sharad Pawar : जागाच खाली नाही तर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष कसे होणार?; सुशीलकुमार शिंदेंचा खोचक सवाल!!


श्रीलंकेच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते श्रीलंकेत एकाच कुटुंबाकडे पंतप्रधानपद, अर्थमंत्रीपद, संरक्षणमंत्री पद, अशी सत्ता एकवटली होती. पण आज त्या देशात जनतेने उठाव केला आहे. जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या घरात घुसून त्यांची राजवट उलथवली आहे. श्रीलंकेची अशी अवस्था तिथे एकाच घराण्यात सत्ता एकवटल्यामुळे झाली. भारतातही अशी एकाधिकारशाही चालू आहे आणि जनता हे फार काळ सहन करणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला.

नागपूर मध्ये महापालिका आणि विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांबरोबर लढाईची का नाही याचा विचार स्थानिक नेत्यांनी करून तशा सूचना नेतृत्वापर्यंत पोहोचवाव्यात. स्थानिक नेत्यांनी केलेला विचार ग्राह्य धरून अंतिम निर्णय करू, असे आश्वासन शरद पवारांनी दिले.

– राष्ट्रवादीच्या घराणेशाहीचे काय??

शरद पवारांनी नागपूरातून श्रीलंकेतल्या घराणेशाहीवर जो प्रहार केला त्याची चर्चा जोरदार सोशल मीडियात सुरू झाली आहे. एकाच कुटुंबाकडे सत्ता एकवटली की काय होते याचा दाखला शरद पवारांनी श्रीलंकेचे उदाहरण देऊन सांगितला. मात्र, त्याचवेळी भारतातल्या घराणेशाहीच्या पक्षांमध्ये आपल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश होतो हे ते सोयीस्कररित्या विसरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वतःकडे. उपमुख्यमंत्रीपद – विरोधी पक्षनेतेपद पुतण्याकडे, खासदारकी मुलीकडे आणि आमदारकी नातवाकडे अशा स्वरूपाची रचना आपल्याच राष्ट्रवादीमध्ये आहे, याकडे शरद पवारांचे दुर्लक्ष झाले. या मुद्यावर सोशल मीडियातून जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे.

Sharad Pawar’s attack on dynasticism in Sri Lanka from Nagpur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात