आरे कारशेड मुद्द्यावर आदित्य ठाकरे आम आदमी पार्टीच्या टार्गेटवर; ठाकरे सरकारने मुंबईला बनवले मूर्ख!!


प्रतिनिधी

मुंबई : अरे कारखेडच्या मुद्द्यावर ठाकरे पिता-पुत्र आणि शिंदे फडणवीस सरकारने सामने असताना आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले आहे. aarey carshed issue : AAP party targets aditya Thackeray

आरे वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे आंदोलन करत आहेत, हे आम्हाला गंमतीशीर वाटते कारढ ठाकरे सरकारने कार शेड कांजूरमार्गला हलवण्यासाठी ठोस काहीही न करून मुंबईकरांना मूर्ख बनवले आहे, हे विसरून चालणार नाही. संधी असताना आरेचे जंगल का वाचवले नाही?, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनीही द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे (आप) मुंबई कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी यांनी दिली.

आरे वन वाचवण्यासाठी वैयक्तिकृत ईमेल

मुंबई आम आदमी पार्टीने आरे वाचवण्याकरीता नवीन वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या आधारे सामान्य जनता मुख्यमंत्री यांना आरे वाचवण्याकरिता साद घालणार आहे. आम आदमी पार्टीने मुंबईत येथील फोर्ट ऑफिस येथे या संदर्भात पत्रकार परिषदचे आयोजन केले होते.

हे वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईट संदर्भात बोलताना रुबेन मस्करेन्हास म्हणाले की, आरे जंगल वाचवण्यासाठी LetMumbaiBreathe.com. या मोहिमेमुळे मुंबईकरांना एका क्लिकवर थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इनबॉक्समध्ये आरे वन वाचवण्यासाठी वैयक्तिकृत ईमेल पाठवता येणार आहे. मेट्रो ३ कारशेड हलवून कांजूरमार्ग येथील मेट्रो ६ कारशेडशी जोडण्याची विनंती करणारे पत्र सामायिक केले आहे. वेबसाइट वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवरून एका बटणावर क्लिक करून हा ईमेल पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘आरे बचाओ’ आंदोलनाला व्यापक जनसमर्थन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना सोप्या स्वयंचलित पद्धतीने सांगण्यासाठी मुंबईकरांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे अभियान एक शक्तिशाली माध्यम आहे, असे मत रुबेन मस्करेन्हास यांनी व्यक्त केले.

आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईकरांच्या पाठीशी

आरेचे जंगल नष्ट करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक पक्षाचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेस सरकारने सर्वप्रथम विनाशाला सुरुवात केली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने जंगल वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील तरुण आणि पर्यावरणवाद्यांना निर्दयीपणे दडपून टाकले. ठाकरे सरकारने सर्व काही केले. आश्वासने दिली पण अडथळे काढून ३३ हेक्टर जमीन पूर्ववत केली नाही. कांजूरमार्ग जागेचे काम सुरू करण्यात आलेले अडथळे दूर करण्यात त्यांचे सरकार कोर्टात योग्य ती बाजू मांडण्यातही अपयशी ठरले. आता शिंदे फडणवीस सरकारमध्येही आरे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा-मेनन यांनी केला.

 

aarey carshed issue : AAP party targets aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण