करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर


आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. Vaccination campaign against Corona virus begins fast, big news about vaccination of children in the age group of 12 to 14 years


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे.दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे लसीकरण. केंद्र सरकारने भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

१२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान आज त्या माहितीचे खंडण करण्यात आले आहे.तसेचं या १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

Vaccination campaign against Corona virus begins fast, big news about vaccination of children in the age group of 12 to 14 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात