विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.The High Court held that there was no error in the decision of the lower court
या याचिकेत ओमर अब्दुल्ला यांनी त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला हिच्यापासून घटस्फोटाची मागणी केली होती.कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करताना, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात कोणतीही त्रुटी नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.
कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटाची याचिका फेटाळल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट दाखल केली होती. आपल्या याचिकेद्वारे त्याने पत्नीवर शारीरिक आणि मानसिक क्रूरतेचा आरोप केला होता. खटल्याच्या सुनावणीनंतर, हायकोर्टाने त्यांचे रिट फेटाळले आणि न्यायालयाने सांगितले की ओमर अब्दुल्ला आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App