केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या गुंडांचा हल्ला!!


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कम्युनिस्टांच्या राजवटीत कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेच आहेत, पण त्या पलीकडे जाऊन हमास सारख्या आंतरराष्ट्रीय जिहादी दहशतवादी संघटनांना वाढता पाठिंबा मिळतो आहे, या पार्श्वभूमीवर केरळमध्ये आता कम्युनिस्ट सरकार पुरस्कृत हल्ले सुरू झाले आहेत. याचा फटका दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नसून खुद्द राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना आज बसला. Conspiracy to harm me physically Kerala governor Arif Mohammed Khan car attacked by SFI activists

राज्यपाल आरीफ मोहम्मद खान राजभवनावरून तिरुअनंतपुरम विमानतळाकडे जात असताना कम्युनिस्ट पक्ष प्रणित स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेच्या काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली काळे झेंडे घेऊन थेट राज्यपालांच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी आपली गाडी राज्यपालांच्या गाडीवर घातली, त्यावेळी पोलिसांनी बघायची भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यपाल आपल्या गाडीतून उतरले. त्यावेळी आपली गाडी तिथेच टाकून देऊन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या गुंडांनी पळ काढला.


दुनियेत शांतता प्रस्थापनेसाठी भारत मजबूत हवा; आरिफ मोहम्मद खान यांची महात्मा गांधींना श्रद्धांजली


हे सगळे पोलिसांच्या देखत घडल्याने राज्यपाल अरिफ मोहम्मद खान भडकले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर आरोप केला. माझ्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुंड पाठवले होते. एरवी राज्यपालांच्या ताफ्यामध्ये बाहेरची कुठली गाडी घुसू शकते, यावर तुमचा विश्वास तरी बसू शकतो का?? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. राज्यात मुख्यमंत्र्यांनी जर गुंड पाठवले असतील तर पोलीस तरी त्याला कसे अडवू शकतील??, असा दुसरा सवाल देखील त्यांनी पत्रकारांना केला.

आत्तापर्यंत केरळमध्ये राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा राजकीय वाद रंगत होता, पण त्या पलीकडे जाऊन आता राज्यपालांवर थेट शारीरिक हल्ला करण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या गुंडांची मजल गेली आहे. केरळमध्ये काहीच दिवसांपूर्वी विविध मुस्लिम संघटनांनी हमास दहशतवादी संघटनेच्या समर्थनासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये रॅली आयोजित केल्या होत्या. त्याला कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे समर्थन होते. या रॅलीवर आरिफ मोहम्मद खान यांनी टीका केली होती. त्यानंतर राज्यपालांवर थेट शारीरिक हल्ला करण्यापर्यंत मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडांची मजल गेली. यातून केरळ मधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती किती भयानक आहे याचे चित्र उघड्यावर आले.

Conspiracy to harm me physically Kerala governor Arif Mohammed Khan car attacked by SFI activists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात