मायावती यांनी पुतण्या आकाश आनंदला बनवले आपला राजकीय उत्तराधिकारी!

2017 मध्ये आकाश यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता.

विशेष प्रतिनिधी 

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुतण्या आकाश आनंद यांना आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. Mayawati made her nephew Akash Anand her political successor

आकाश हे बसपचे राष्ट्रीय समन्वयकही आहे. 2017 मध्ये आकाश यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. मायावतींनी 2017 मध्ये एक मोठी सभा घेऊन आकाश आनंद यांना राजकारणात आणले होते. आकाशने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे.


बसपा सुप्रिमो मायावतींनी निवडणूक निकालांवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाल्या …


मायावती आज सकाळी आकाश आनंदसोबत बैठकीला पोहोचल्या होत्या. अलीकडेच बसपने आकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षांत आकाशची पक्षातील सक्रियता वाढत आहे. सुरूवातीला मायावतींनी आकाश यांची स्टेजवर ओळख करून दिली होती.मायावतींनी आकाश आनंदला पक्ष समन्वयकपद दिलं होतं. आकाशने इतर राज्यात संघटनेच्या बैठका घेतल्या. आकाश आनंद हा मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे.

Mayawati made her nephew Akash Anand her political successor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात