विशेष प्रतिनिधी
पुणे : अयोध्येत रामलल्ला लवकर नवीन भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशच नाही तर जगभरातून लोक येणार आहेत. सर्वांनाच या सोहळ्याची उत्सुकता आहे आणि आतुरतेने वाट पाहत आहे. A young man left Pune on a bike for the Prabhu Sri Ramas Prana Pratishtha ceremony in Ayodhya
या पार्श्वभूमीवर पुण्यातील एक २८ वर्षीय तरूण सायकलवरून अयोध्येला निघाला आहे. बलराम वर्मा असे त्याचे नाव आहे. आपल्या या प्रवासात तो वाटेत भेटणाऱ्या लोकांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणदेत आहे.
मागील १७ दिवसांपासून हा तरूण प्रवास करत असून, १५ जानेवारी रोजी तो अयोध्येत पोहचणार आहे. बलराम वर्मा प्रयागराज येथील मूळचा रहिवासी आहे. अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर या तरुणाने अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे अयोध्येला जाण्यासाठी या तरुणाने कँटीनची नोकरी सोडली आहे. जाताना त्यांने शिर्डीत जाऊन साईबाबांचेही दर्शन घेतले आणि तिथून पुढे तो मध्य प्रदेशात पोहचला. जिथे मग त्याने ओंकारेश्वरमध्ये दर्शन घेतले, याचबरोबर उज्जैनच्या महाकालचेही दर्शन घेतले. आता तो बागेश्वर धामला पोहचणार असून चित्रकूटमार्गे अयोध्येला पोहचणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more