तेलंगणात धर्मनिरपेक्षता टांगली खुंटीवर; काँग्रेसने AIMIM घेतली मांडीवर!!; अकबरुद्दीन ओवैसींना नेमले प्रोटेम स्पीकर!!


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : तेलंगणात धर्मनिरपेक्षता टांगली खुंटीवर, काँग्रेसने AIMIM घेतली मांडीवर!!, असे घडून आले आहे.
Akbaruddin Owaisi appointed Protem Speaker

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपवर जातीयवाद, धर्मवादाचे आरोप ठेवून काँग्रेसी धर्मनिरपेक्षतेच्या बाता खूप मारल्या. भाजप आणि BRS एकमेकांचे भाऊ असल्याचा आरोप केला. काँग्रेस तेलंगणात धर्मनिरपेक्ष राज्य आणेल, अशी ग्वाही दिली.

पण BRS ला हरवून तेलंगणाची सत्ता मिळवल्याबरोबर काँग्रेसने आपले रंग बदलले. धर्मनिरपेक्षता खुंटीला टांगून ठेवली आणि तेलंगणा मधला सर्वाधिक मुस्लिम धार्मिक कट्टरतावादी पक्ष AIMIM ला मांडीवर घेतले. त्या पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना तेलंगणा विधानसभेचे प्रोटेम स्पीकर नियुक्त केले. निवडणूक होईपर्यंत याच AIMIM पक्षाला आणि ओवैसी बंधूंना काँग्रेसचे नेते शिव्या घालत होते. त्यांना धर्मांध म्हणत होते. AIMIM आमचे नेते देखील काँग्रेसला पाण्यात पाहत होते आणि चंद्रशेखर राव यांच्या BRS भाऊ मानत होते, पण तेलंगणातील सत्ता बदलली आणि काँग्रेस तसेच AIMIM यांनी आपले रंग बदलून सत्तेसाठी हातमिळवणी केली. अकबरुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसकडून विधानसभेचे प्रोटेम स्पीकर पद पदरात पडून घेतले.

वास्तविक प्रोटेम स्पीकर हा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातला सर्वात ज्येष्ठ आमदार किंवा खासदार असतो. त्यानुसार काँग्रेसमधल्या सर्वात ज्येष्ठ आमदाराला ती संधी मिळायला हवी होती, पण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून प्रोटेम स्पीकर पदाची माळ अकबरुद्दीन ओवैसी यांच्या गळ्यात घातली.

– भाजप आमदारांचा बहिष्कार

भाजपचे नेते आमदार टी. राजा सिंह यांनी काँग्रेस आणिAIMIM यांचे बदललेले रंग आणि त्यांनी केलेले राजकीय साटेलोटे एक्सपोज केले. अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमदार शपथविधी समारंभात सहभागी होणार नाही. त्या कार्यक्रमावर बहिष्कार घालू. विधानसभेचे नियमित अध्यक्ष निवडल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही आमदार पदाची शपथ घेऊ, असे राजा सिंह यांनी जाहीर केले.

तेलंगणाच्या नव्या विधानसभेत भाजपचे 8 आमदार निवडून आले आहेत, तर AIMIM या पक्षाचे 7 आमदार निवडून आले आहेत. पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे तरी देखील काँग्रेसने मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी AIMIM पक्षाच्या अकबरुद्दीन ओवेसी यांना मुद्दाम प्रोटेम स्पीकर नेमले, असा आरोप टी. राजा सिंह यांनी केला.

Akbaruddin Owaisi appointed Protem Speaker

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात