नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!

P V Narasimha Rao and Pranab Mukherjee

नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डायरीतून पडला “प्रकाश” आणि त्यातूनच उलगडली गांधी परिवाराची अंधारी बाजू!!, असे म्हणावे लागेल, कारण प्रणवदांच्या डायरीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत. त्यातून त्यांचे नरसिंह राव यांच्याबरोबरचे संबंध किती आणि कसे मधूर होते, हे तर उघड झालेच आहे, पण त्याचबरोबर सोनिया गांधींनी व्यक्तिगत आकसातून नरसिंह रावांशी संबंध ठेवू नका, असा निरोप प्रणवदांना पाठविल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे. P. V. Narasimha Rao and Pranab Mukherjee had very good relations, but Gandhi Gandhi family had apprehensions about both of them

प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या वडिलांच्या डायऱ्या आणि त्यांच्याशी झालेले संभाषण यावर आधारित लिहिलेल्या “इन प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स” पुस्तकातून नरसिंह राव आणि प्रणव मुखर्जी संबंधांवर विशेष प्रकाश टाकला आहे.

नरसिंह राव आणि प्रणव मुखर्जी ही काँग्रेस मधली अत्यंत बुद्धिमान अशी दोन उत्तुंग व्यक्तिमत्वे. दोघेही आपापल्या कर्तृत्वावर उच्च पदांवर पोहोचले, पण दोघांमधला “कॉमन फॅक्टर” असा, की दोघांचेही गांधी परिवाराशी फारसे मधूर संबंध टिकू शकले नाहीत आणि त्याला कारणीभूत या दोन नेत्यांमध्ये कुठले राजकीय अवगुण नसून गांधी परिवारातले अवगुण त्याला कारणीभूत ठरल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांची स्वतंत्र प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता गांधी परिवाराला स्वतःच्या क्षमतेपलीकडची आव्हानात्मक वाटली. त्यातून या दोन्ही नेत्यांविषयी गांधी परिवाराच्या मनात भीती आणि आकस तयार झाला. प्रणवदांच्या डायरीत याचे वेगवेगळ्या टप्प्यांवर खुलासे दिसतात.

मूळात प्रणवदांनी लिहिलेली एकच डायरी नाही, त्या एकूण 51 डायऱ्या आहेत. त्यादेखील प्रणवदांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर लिहिल्या आहेत. देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत वेगवेगळ्या उच्च पदांवर काम करताना प्रणवदांचे अनुभव आणि निरीक्षणे यांचे प्रतिबिंब त्यात पडले आहे. राजीव गांधींशी मतभेद झाल्यानंतर प्रणवदांनी काही काळ डायऱ्या लिहिण्याचे थांबविले होते, पण हे नरसिंह राव यांना कळताच त्यांनी प्रणवदांना डायऱ्या लिहिणे थांबवू नका, हे स्पष्ट बजावले होते, प्रणवदांनी नरसिंह रावांची सूचना मान्य करून डायऱ्या लिहिणे पुन्हा सुरू केले, अशी आठवण शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितली.

याचा अर्थच नरसिंह राव आणि प्रणव मुखर्जी यांच्यातली पॉलिटिकल केमिस्ट्री किती जबरदस्त होती, हेच शर्मिष्ठा मुखर्जींनी अधोरेखित केले.

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जींना कधीच पंतप्रधान होऊ दिले नाही. राजीव गांधींनी त्यांना आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, पण नरसिंह राव यांनी प्रणवदांच्या राजकीय कारकीर्दीला नव संजीवनी दिली. त्यांना सुरुवातीला नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष केले आणि नंतर आपल्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री केले.

पण या दोघांची पॉलिटिकल केमिस्ट्रीच सोनिया गांधींना खटकली होती. त्यामुळेच सोनिया गांधींनी प्रणवदांना नरसिंह रावांच्या कारकिर्दीच्या अखेरीस एक निरोप पाठवला होता. नरसिंह रावांवर त्यावेळी वेगवेगळ्या सीबीआयच्या चौकशी लागल्या. त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. त्यावेळी तुम्ही नरसिंह राव यांच्याबरोबर संबंध ठेवू नका, असे सोनिया गांधींनी माखनलाल फोतेदार यांच्या मार्फत प्रणवदांना सांगितले होते. प्रणवदांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांना प्रणवदांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटण्याएवढा हा निरोप “गंभीर” होता. पण प्रणवदांनी नरसिंह रावांबरोबरचे आपले संबंध तोडले नाहीत, उलट नरसिंह रावांच्या निधनापर्यंत त्यांचे संबंध मधूरच राहिले. नरसिंह रावांच्या निधनानंतर त्यांचा पार्थिव देह सोनिया गांधी आणि गांधी परिवाराने काँग्रेसच्या मुख्यालयात येऊ दिले नाही, ही बाब प्रणवदांना अत्यंत खटकली होती. त्याबद्दल ते सोनिया गांधींना कधीही माफ करू शकले नाहीत, अशी परखड आठवण शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितली.

मूळात प्रणवदांनी 51 डायऱ्या लिहिल्या. पण त्या लिहिणे मध्येच थांबविल्यानंतर नरसिंह रावांनी त्यांना पुन्हा डायऱ्या लिहिण्यासाठी उद्युक्त केले आणि त्या प्रोत्साहनाला मान देऊन प्रणवदा पुन्हा डायऱ्या लिहू लागले ही घटनाच या दोन्ही बुद्धिमान नेत्यांच्या मधूर संबंधांवर वेगळा प्रकाश टाकते. कारण त्यातून दोघांची मैत्री तर उलगडलीच, पण त्यामुळे देशाच्या वर्तमानकालीन इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण कालखंड जनतेसमोर आला आहे.

P. V. Narasimha Rao and Pranab Mukherjee had very good relations, but Gandhi Gandhi family had apprehensions about both of them

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात