फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना दणका पण सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांचा कळवळा, असे आजच्या नवा मालिकांच्या राजकारणावरून म्हणावे लागेल. कारण नवाब मलिक नागपूर अधिवेशनाला येऊन सत्ताधारी बाकावर शेवटी बसले. त्यावरून सुरुवातीला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे घामासान झाले, पण नंतर त्या घामासानाचे रूपांतर महायुतीतल्या वर्चस्वात झाले. Supriya sule showed sympathy for nawab malik

नवाब मलिक महायुतीत नकोत, असे परखड पत्र लिहून देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात महायुतीत भाजपच “खरा दादा” असल्याचे सिद्ध केले पण यामुळे सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांविषयी कळवळा व्यक्त करण्याची संधी मिळाली.नवाब मलिक आपले भाऊ आहेत त्यांच्याविरुद्धचे देशद्रोहाचे आरोप खोटे आहेत. ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजप विरोधात ते ताकदीने लढले. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांचा सन्मानच होईल. माझ्यासाठी तर त्यांच्या कुटुंबातले भाऊ आहेत. त्यांच्यावरचे देशद्रोहाचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संदर्भात काही पत्र लिहिले असेल, तर महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर गेले असे म्हणावे लागेल असा दावा करून सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांविषयी कळवळा दाखविला.

नवाब मलिक यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात सहभाग घेतला. ते शांतपणे येऊन सत्ताधारी बाकांवर पाठीमागे बसले. अजित पवार यांनी नवाब मलिकांच्या जामीनवरच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते, ते लक्षात घेऊनच नवाब मलिक अजित पवारांच्या बाजूने जाऊन बसले, पण सायंकाळपर्यंत या घटनेचे फार मोठे राजकारण होऊन भाजपचा दणका अजित पवारांनाच सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांविषयी कळवळा दाखविण्याची संधी मिळाली.

Supriya sule showed sympathy for nawab malik

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*