370 वरून नेहरु पुराव्यांसह आरोपीच्या पिंजऱ्यात अडकताच फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकरांना आठवले, वल्लभभाई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 370 कलमावरून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरोपीच्या पिंजऱ्यात पुराव्यांसह अडकताच विरोधकांना आठवले, वल्लभभाई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी, असे म्हणायची वेळ विरोधकांच्या टीकेने आणली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वल्लभभाई पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांची नावे घेऊन 370 कलमाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. After revealing pt. Nehru’s mistake on 370, farooq Abdullah and prakash ambedkar targets sardar patel and syma prasad mukherjee

जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयकाल काल राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुराव्यांसह आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पंडित नेहरूंनी अवेळी आणि अकारण शस्त्रसंधी केली नसती, तर संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात आले असते. “पाकिस्तान व्याप्त काश्मीर” हे शब्द देखील अस्तित्वात आले नसते. पण काश्मीरमध्ये भारतीय सेना जिंकत असताना पाकिस्तानी सैन्याची पीछेहाट होत असताना पंडित नेहरूंनी ऐनवेळी पाकिस्तानशी शस्त्रसंधीची चूक केली. इतकेच नाही, तर त्यांनी काश्मीर प्रश्न स्वतःहून संयुक्त राष्ट्र संघात नेऊन त्याला अकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. पण नंतर ही चूक झाल्याची कबुली स्वतः पंडित नेहरूंनी आपल्या लेखनातून दिली. याची पुराव्यांसह मांडणी अमित शहा यांनी राज्यसभेत केली. अमित शहांच्या भाषणामुळे चिडलेल्या विरोधकांनी त्यावेळी सभात्याग केला.

पण कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 370 कलम पंडित नेहरूंमुळे नव्हे तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे घटनेत समाविष्ट केले गेले, असा आरोप केला. आपले आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला विरोध होता, पण काश्मीर मधल्या मुसलमान, बौद्ध आणि हिंदू या सर्वांच्या अधिकार रक्षणासाठी डॉ. आंबेडकर झटतच होते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पण त्यांच्या टीकेचा प्रमुख रोख हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरच होता.

त्यांच्यानंतर आज जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी देखील 370 कलमाच्या मुद्द्यावर पंडित नेहरूंना क्लीन चीट देत सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यापुढे जाऊन जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जबाबदार धरले.

फारूक अब्दुल्ला म्हणाले, मला कळत नाही, की या लोकांच्या मनात पंडित नेहरूंविषयी एवढे विष का भरले आहे??, 370 कलमाचा मुद्दा जेव्हा समोर आला, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू भारतात नव्हतेच. ते अमेरिकेत होते. कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला, तेव्हा वल्लभभाई पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या बैठकीला उपस्थित होते. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम लागू करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला, असा दावा डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केला.

पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलमावरून पंडित नेहरूंना पुराव्यांसह आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर विरोधकांना सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे दोन्ही नेते आठवल्याचे यानिमित्ताने समोर आले.

After revealing pt. Nehru’s mistake on 370, farooq Abdullah and prakash ambedkar targets sardar patel and syma prasad mukherjee

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात