वृत्तसंस्था
तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यास उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जानेवारी रोजी होईल.राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने ८ नोव्हेंबर रोजी अटी-शर्तींसह मंदिर संस्थानला सोने-चांदी वितळवण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याला हिंदू जनजागृती समितीने जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते.Bench ban on melting gold, silver offered to Tulja Bhavani; Notice of the petition of Hindu Janajagruti Samiti
त्यावर न्यायालयाने ८ डिसेंबर रोजी पुढील तारखेपर्यंत सोने-चांदी वितळवण्यास मनाई केली आहे. याप्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी मंदिर संस्थानकडे तक्रार दाखल करत सोने चांदी मोजणी प्रक्रियाच थांबवण्याची मागणी लावून धरली होती. मात्र मंदिर संस्थानने गंगणे यांची मागणीची दखल घेतली नव्हती.
संस्थानकडे २०६ किलो सोने, २,५७० किलो चांदीचा ऐवज
भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या – चांदीची मोजदाद २००९ नंतर प्रथमच करण्यात आली होती. या वेळी तब्बल २०६ किलो सोने, तर २,५७० किलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. यापैकी २०६ किलो सोने रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली वितळवण्यात येणार होते. त्याद्वारे संस्थानला शुद्ध सोने मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App