विरोधी ऐक्याची बैठक यशस्वी झाल्याचा दावा; ओमर अब्दुल्लांनी केलेला राजकीय विनोद वाचा!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाटण्यात 23 जून रोजी झालेली विरोधी पक्षांची ऐक्याची बैठक ही केवळ फोटोशूट नव्हती, तर त्याच्या रिझल्टची 2024 मध्ये पर्यंत वाट पाहा. ती बैठकी यशस्वीच झाली, असा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी जो निकष लावला आहे, तो मात्र राजकीय विनोदाचा उत्तम नमुना आहे!! The opposition unity meeting was claimed to be a success

विरोधी ऐक्याची बैठक फोटोशूट नव्हतीच याचा पुरावा म्हणजे भाजपच्या नेत्यांना त्यावर प्रतिक्रिया देणे भाग पडले, इतकेच नाही तर खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली याचा अर्थच ती बैठकी यशस्वी झाली, असा दावा ओमर अब्दुल्ला यांनी केला.

ओमर अब्दुल्ला म्हणाले, की विरोधी पक्ष एकत्र येऊन 2024 ची निवडणूक लढवणार आहेत. त्याच्या रिझल्टची आत्ताच तुम्ही घाई करू नका. 2024 पर्यंत वाट पाहा. पण ती बैठक केवळ फोटोशूट साठी होती, असा आरोप भाजप नेते करतात, तो खोटा आहे. खरं म्हणजे त्यांना या बैठकीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली. खुद्द केंद्रीय गृहमंत्री जे देशातल्या सगळ्या पॉवरफुल नेत्यांमध्ये क्रमांक दोनचे नेते मानले जातात, त्यांना या बैठकी बद्दल काही बोलावे लागले त्यातच विरोधी ऐक्याच्या बैठकीचे यश आहे. 2024 मध्ये त्याचा रिझल्ट दिसेल.

ओमर अब्दुल्ला यांनी विरोधी ऐक्याच्या बैठकीचा बैठकीच्या यशस्वीतेचा निकषच मूळात भाजप नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अथवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेली दखल एवढ्या पुरत्या मर्यादित लावला, हाच तो राजकीय विनोदाचा भाग आहे. कारण विरोधी ऐक्य पुढे कसे सरकणार??, भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष म्हणून एकास एक उमेदवार कसा देणार??, या विषयी ओमर अब्दुल्लांनी चकार शब्द काढला नाही. उलट फक्त भाजप नेत्यांनी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली एवढ्यावरच जणू काही बैठकीतले 15 पक्षांचे नेते विरोधी ऐक्याच्या परीक्षेत 35 % नी पास झाले, असाच ओमर अब्दुल्लांच्या बोलण्याचा आशय होता.

The opposition unity meeting was claimed to be a success

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात