‘’दोष युवराजांचा नाही, ‘मातोश्री’ बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात…’’ आशिष शेलारांनी लगावला टोला!


‘’…म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना ’’इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन…’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाले असून, मुंबईसह सर्वच ठिकाणी मागील दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबईला तर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ज्याला भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP MLA Ashish Shelars response to Aditya Thackerays criticism

आशिष शेलार म्हणाले,  ‘’तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली. म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.’’

याशिवाय ‘’यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, ‘मातोश्री’च्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना…’’इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? –

‘पाऊस झाला याचं स्वागत करा, पाणी साचलं ही तक्रार काय करता,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. या विधानावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. “मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. याशिवाय “आमच्या कार्यकाळात ३०० मिमी आणि ४०० मिमी तासाला पाऊस पडत होता. तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवत होतो.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

BJP MLA Ashish Shelars response to Aditya Thackerays criticism

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात