नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बारगळल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन करायच्या बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांना आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा दिली. त्यांनी ज्या प्रादेशिक पक्षांनी आपल्या नावानं मधून काँग्रेसचे नाव वगळलेले नाही, त्या सगळ्यांनी मूळ काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला दिला. त्यामध्ये त्यांनी तृणमूळ काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश केला. भारतात फक्त दोन विचारधारांचे पक्ष अस्तित्वात राहतील. बाकीचे प्रादेशिक पक्ष स्थानिक पातळीवर महत्त्वाचे राहतील, पण राष्ट्रीय पातळीवर भाजप सरकार हिंदू राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस सारखा धर्मनिरपेक्ष पक्ष हे दोनच पक्ष बळकट राहतील. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात दोनच पक्ष बळकट आहेत, तसेच भारतात होईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पण त्याच वेळी विलीनीकरणाचा निर्णय शरद पवारांनी घ्यायचाय, अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली.
पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक गेहलोत यांच्यासारख्या दोन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाच्या विषयाला हवा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांना आपले राजकीय भवितव्य काँग्रेसच्या आश्रयाला गेल्यावर सुरक्षित झाल्यासारखे वाटले असल्यास त्यात नवल काही नाही, पण शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घेतल्यानंतर काँग्रेसची ताकद वाढेल की पक्षात गटबाजी वाढेल??, असा सवाल समोर आला. Congress party
काँग्रेसची ओळख
कारण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा त्याच्या राजकीय आणि सामाजिक ताकदीच्या बरोबरीने गटबाजी साठीच नेहमी ओळखला गेला. काँग्रेसची अफाट ताकदच गटबाजीला खतपाणी घालणारी ठरली. नेहमी दोन गटांमध्ये झुंज लावून द्यायची आणि वरती मजा बघत बसायची ही काँग्रेसच्या हायकमांडची वर्षानुवर्षांची सवय होती. कारण त्यावेळी प्रभावी असा विरोधी पक्षच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्षाला गटबाजीचा फारसा फरक पडत नव्हता.
पवारांचा गटबाजीचा इतिहास
खुद्द शरद पवारांनीच काँग्रेस पक्षात राहून आणि काँग्रेस पक्षाच्या बाहेर जाऊन नेहमीच काँग्रेस मधल्या गटबाजीला खतपाणी घातल्याचा इतिहास फारसा जुना नाही. उलट तो काँग्रेसचा समकालीन इतिहासच आहे. त्यासाठी अगदी 1978 च्या शरद पवारांच्या बंडाच्या किंवा खंजीर खुपसण्याच्या विषयापर्यंत जायची गरज नाही. अगदी 1990 पासून शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिला, तर काँग्रेसमधल्या गटबाजेशी शरद पवारांचा किती जवळचा संबंध आहे, हे सहज समजून येईल. कारण 1990 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा निवडणुका लढली आणि सत्तेवर आली होती, तरी त्या पक्षाने पहिल्यांदा विधानसभेतले बहुमत गमावले होते. त्याच निवडणुकीत शरद पवारांनी काँग्रेसमध्ये एका मोठ्या गटाला बाजूला काढून अपक्ष उभे केले होते आणि नंतर त्याच अपक्षांच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केले होते. अर्थात काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला हात लावू नये, यासाठी त्यांनी ती “काळजी” घेतली असल्याचे त्यावेळी आणि नंतरही पवारांच्या समर्थकांनी सांगितले होते.
1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीने पवारांच्याच नेतृत्वाखालच्या काँग्रेसचा पराभव केला होता. त्यावेळी पवारांना अपक्षांची साथ मिळाली नाही, पण पवारांनी अपक्षांची साथ शिवसेना आणि भाजप सरकारला मिळवून देण्यात धन्यता मानली होती. त्यावेळी पवारांनी काँग्रेस पक्षाची सत्ता घालून दाखविली होती. अतुल पवारांना आपण आणि काँग्रेस अशाच बेरजेचे राजकारण केले, तर काँग्रेस सत्तेवर येईल, असे काँग्रेसच्या हायकमांडला दाखवून द्यायचे होते, पण पवार त्यामध्ये थोडे कमी पडले म्हणूनच पवार अखंड काँग्रेस ठेवून निवडणूक हरले होते.
काँग्रेस मध्ये विलीन व्हायचेय का??
1999 नंतरचा पवारांचा इतिहास काँग्रेसमधून बाहेर पडल्याचा आणि नंतर सोनिया गांधींची जुळवून घेऊन काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचा ठरला. आता जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चोहोबाजूंनी अडचणीत आली आहे आणि भाजपच्या कुठल्याच परवानगीशिवाय दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण सुद्धा करणे शक्य नाही, हे लक्षात येताच पवारांच्या गोटातून काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून आले. एकतर पवारांना स्वतंत्रपणे पक्ष चालवता येणे कठीण झाले, त्यात अजित पवारांची अकाली एक्झिट झाली, त्यामुळे सुनेत्रा पवारांचे राजकीय भवितव्य भाजपच्या गोटात जाऊन सुरक्षित झाले, पण सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य स्वतंत्र राहून अस्थिर बनले. सुप्रिया सुळे यांचे भवितव्य स्थिर करण्यासाठी पवारांच्या गोटातून काँग्रेसमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या बातम्यांचे पेव फुटले.
पवारांमुळे गटबाजीचा धोका
पण पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर त्या पक्षाची ताकद वाढण्यापेक्षा पक्षातली गटबाजीच नवे रूप धारण करायची शक्यता आहे. पवार समर्थकांची काँग्रेस आणि पवार विरोधकांची काँग्रेस असे दोन गट पक्षात तयार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस बाहेर राहून पवारांनी फक्त सत्तेसाठी काँग्रेसची जुळवून घेतले, पण काँग्रेस सत्तेबाहेर पडल्यानंतर त्यांनी मोदींशी जुळवून घेतले. मोदींना हवे तसे “अदानी नॅरेटिव्ह” चालविले. काँग्रेसच्या छोट्या – मोठ्या यशात सुद्धा खोडा घालायचा “डाव” खेळला. अशा पवारांना त्यांच्या पक्षासकट काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्यात इतपत शहाणपण आहे का??, याचा विचार काँग्रेस हायकमांडला करावा लागेल. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा तृणमूळ काँग्रेस काय हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये हरल्यामुळे ते काँग्रेसच्या आश्रयाला जाऊ पाहत आहेत. एरवी ते पक्ष जिंकण्याच्या स्थितीत होते, तेव्हा ते मूळ काँग्रेसला बिलकुल विचारत नव्हते. उलट ते काँग्रेसचा द्वेष करत होते, हा इतिहास पुराणा नाही, तर समकालीन आहे. त्याकडे काँग्रेसच्या हायकमांडला डोळेझाक करून चालेल का??, हा खरा सवाल आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On rumour of NCP-SCP and Congress merger, senior Congress leader Prithviraj Chavan says, "I have read and heard this in the media. Personally, I do not know anything about this…All parties who have not dropped Congress from their names – be it TMC… pic.twitter.com/riMjaP049x — ANI (@ANI) July 2, 2026
#WATCH | Mumbai, Maharashtra: On rumour of NCP-SCP and Congress merger, senior Congress leader Prithviraj Chavan says, "I have read and heard this in the media. Personally, I do not know anything about this…All parties who have not dropped Congress from their names – be it TMC… pic.twitter.com/riMjaP049x
— ANI (@ANI) July 2, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App