वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिंदू समाजासंदर्भात नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांनी नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागेची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवरच नफरत फैलावण्याचा आरोप केला आहे. Samajwadi Party’s veteran MP Shafiq ur Rehman Bark’s demand for a place for namaz in the new Parliament
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काल नव्या संसदेचे काम सुरू झाले. आज लोकसभेत 33% महिला आरक्षण विधेयकही मांडण्यात आले. या विधेयकाला समाजवादी पार्टीचा विरोध आहे. मात्र त्याच पक्षाचे 93 वर्षांचे खासदार शफिक उर रहमान बर्क यांनी नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागा मागितली आहे. भाजपचे सरकार मुसलमानांविरुद्ध नफरत फैलावत राहते. ते काय नमाज पठणासाठी मुसलमानांना जागा देणार??, असा सवालही बर्क यांनी केला आहे.
जुन्या संसदेतल्या अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून याच शफिक उर रहमान बर्क यांचा गौरव केला होता. मात्र त्यांनीच भाजप मुसलमानांविरुद्ध नफरत फैलावतो, असे सांगत नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागा मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App