एकीकडे भारताची आगेकूच; दुसरीकडे चीन आणि काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??


एकीकडे भारताची आगेकूछ आणि दुसरीकडे चीन काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??, हे शीर्षक वाचून काही वेगळे वाटू शकते, पण तसे बिलकूल नाही. भारताची खरंच अनेक बाबतीत आगेकूच सुरू आहे आणि त्याचवेळी चीन आणि भारतातली काँग्रेस यांची मात्र पीछेहाट होताना दिसते आहे. India is marching ahead, but China and Indian national Congress suffer setbacks, why and how??

उदाहरणे द्यायची झाली, तर भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाही व्यवस्था यांची देता येतील. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था मजबूत होताना दिसते, तर चिनी अर्थव्यवस्था डळमळताना दिसते. चीन मंदीच्या गर्तेत सापडला आहे. पण कम्युनिस्ट पार्टीच्या पोलादी पडद्याआडच्या राजवटीत तिथल्या बातम्या बाहेर येत नाहीत किंवा कमी येतात. पण आजच्या “ग्लोबल” जगात जेवढ्यात तिथल्या बातम्या बाहेर येतात, तेवढ्यावरूनच चिनी मंदीची गर्ता किती खोल आहे, हे कळते.

भारतात 33 % महिला आरक्षण विधेयक मांडून संमत झाल्यावर भारतीय लोकशाहीच्या लोकप्रतिनिधित्वाचे स्वरूपच पूर्ण बदलून जाईल. पण चीनमध्ये तशी स्थिती नाही. कारण तिथे कम्युनिस्टांची पोलादी पडदा राजवट आहे. याचा अर्थ लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची आगेकूच होताना, चीन मात्र कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्याआडच राहण्याची शक्यता आहे.

पण त्या पलीकडे जाऊन चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या पोलादी पडद्याच्या राजवटीला भारतातल्या काँग्रेस सारखेच तडे गेल्याचे दिसते. याचे उदाहरण चीनचे सर्वेसर्वा ही जिनपिंग यांनी आपल्या सर्वाधिकारातून नेमलेले परराष्ट्रमंत्री क्विन वांग आणि संरक्षण मंत्री ली शांगफू यांना बाजूला करावे लागले, हे आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री एकतर गायब होतात आणि काही विशिष्ट संशयातून नंतर त्यांना हटविले जाते, हे भारतातल्या काँग्रेस राजवटीचे काही वर्षांपूर्वी वैशिष्ट्ये होते. पण ते आता चीनमध्ये दिसते आहे.

काँग्रेस प्रणित युपीए सरकारमध्ये बहुतांश मंत्री भ्रष्टाचाराच्या कर्दमात अडकले होते. भारतात लोकशाही असल्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे काँग्रेसला कधी नव्हे एवढा पराभवाचा धक्का बसला आणि काँग्रेस सत्तेच्या वर्तुळाबाहेर कायमची फेकली गेली की काय असे वाटण्याइतपत राजकीय परिस्थिती तयार झाली. याचा अर्थ चीन मध्ये तसेच घडेल असे नाही. कारण चीनवर आजही कम्युनिस्ट राजवटीची घट्ट पकड आहे, हे खरे, पण त्या पोलादी राजवटीला तडे गेले आहे हेही तितकेच खरे!!

 शी जिनपिंग यांच्या पकडीविषयी शंका

माओ झेडाँग यांच्या नंतरचे सर्वात शक्तिशाली नेते शी जिनपिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून अवघ्या दीड वर्षांपूर्वी
चीनमध्ये परराष्ट्र मंत्री क्विन वांग आणि संरक्षण मंत्री ली शांगफू यांना नेमले होते. शी जिनपिंग यांच्यासारख्या सर्वात शक्तिशाली नेत्याला आपले विश्वासू मंत्री अवघ्या दीड वर्षात बदलावे लागले, याचा अर्थच शी जिनपिंग यांची एक तर निवड चुकली किंवा चिनी कम्युनिस्ट राजवटीत भ्रष्टाचाराचा चिखल इतका खोलवर रुतला आहे, याचा त्यांना अंदाज आला नाही… पण जे काही असेल ते चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या पोलादी राजवटीला तडा देणारे ठरले हे मात्र निश्चित!!

… आणि इथेच चिनी कम्युनिस्ट पोलादी पडदा राजवट आणि काँग्रेस यांच्यातले साम्य दिसते. चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस यांच्यात नाही तरी युपीए राजवटीच्या वेळी सामंजस्य करार झालाच होता. मग थोडे मराठीतल्या वाक्प्रचारासारखे त्यांचे झाले नसेल ना, ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला!! म्हणजे भारतातल्या काँग्रेसशी करार केल्याबरोबर त्याचा परिणाम म्हणून अवघ्या 10 – 12 वर्षांत चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्याला भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांनी तडे गेले, असे तर घडले नाही ना!!… अर्थात चिनी भ्रष्टाचाराशी थेट काँग्रेसचा संबंध असेलच असे नाही, पण परराष्ट्र मंत्री क्विन गांग आणि संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्यासारखे बडे मंत्री गायब होतात किंवा त्यांना हटवण्याची वेळ येते, यातच भारतीय काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी यांच्यातले साम्य दिसते!!

क्विन गांग विशिष्ट असाइनमेंट साठी अमेरिकेत असताना त्यांचे एका महिलेबरोबर संबंध जुळले आणि त्यांना तिच्यापासून एक मूल झाले, अशी गुप्त वार्ता चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या गुन्हे संशोधन समितील मिळाली आणि त्याचा परिणाम म्हणून आधी क्विन गांग गायब झाले आणि नंतर त्यांना परराष्ट्रमंत्री पदावरून अधिकृतरित्या हटविण्यात आले. आता त्यांचे अमेरिकेतील महिलेसोबतचे संबंध याचा गुप्त हेरगिरीशी काही संबंध आहे का??, याचा खुलासा मात्र चिनी राजवटीने केला नाही.

ली शांगफू हे संरक्षण साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारात 2017 पासून अडकले आहेत. त्यांची चौकशी तेव्हापासून सुरू होती. तरीदेखील त्यावेळी शी जिनपिंग यांचीच राजवट होती तरी देखील जिनपिंग यांनी शांगफू यांचीच निवड संरक्षण मंत्री म्हणून केली. पण आता अचानक त्यांना व्हिएतनाम बरोबरच्या एका बैठकीतून “तब्येतीचे कारण” सांगून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते गायब झाले आणि आता ते चीनचे संरक्षण मंत्री नाहीत.

या सगळ्याची राजकीय गोळाबेरीज हीच, की चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय काँग्रेस यांच्यात सध्या तरी विलक्षण साम्य आहे आणि त्यांची राजकीय पीछेहाट सुरू आहे.

India is marching ahead, but China and Indian national Congress suffer setbacks, why and how??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात