वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!

आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत, शोधकार्य सुरू

विशेष प्रतिनिधी

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. वडोदराच्या हरणी तलावात एक बोट उलटल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवर २३ विद्यार्थी आणि चार शिक्षक होते, असे सांगण्यात येत आहे.More than 25 students drowned after Vadodaracharya Harani Talawat boat capsized

आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार यापैकी पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वडोदरा येथे बोट उलटल्याच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. बोटीतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे बचावकार्य सध्या सुरू आहे. अपघातातील जखमींना तातडीने मदत आणि उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

More than 25 students drowned after Vadodaracharya Harani Talawat boat capsized

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात