मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे….

Modi cabinet


नाशिक : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे त्या खऱ्या ठरतील??, असा सवाल विचारायची वेळ वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे आली.Modi cabinet ever turned out to be true so far? So, going forward…

देशभरातल्या आणि जगभरातल्या सगळ्या माध्यमांनी मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी राजकीय हवेत भरपूर पतंग उडविले. पण गेल्या बारा वर्षांमध्ये एकही पतंग त्या हवेत टिकू शकला नाही. म्हणजेच मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची एकही बातमी अचूक ठरू शकली नाही. कारण कुठल्याच माध्यमांमध्ये मोदींच्या सरकारमध्ये शिरकाव करण्याचा दम नाही, याची कबुली इंडिया टुडे माध्यम समूहाचे प्रमुख अरुण पुरी यांनी काहीच वर्षांपूर्वी दिली होती. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण येणार कोण जाणार याची साधी भनकही माध्यमांना लागत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार हे माध्यमांना समजत नाही, कारण माध्यमे मोदींपर्यंत खऱ्या अर्थाने कधी पोहोचू शकत नाहीत. मोदींच्या मंत्रिमंडळातल तशा कुठल्याही फटी नाहीत, की जिथून माध्यमांचे “सोर्सेस” बातम्या काढू शकतील, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाविषयी बातम्या मिळत नाहीत, असे अरुण पुरी म्हणाले होते.



– संभाव्य यादी

पण तरीसुद्धा माध्यमांनी मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे पतंग उडवायचे सोडले नाही. त्यांनी मोदी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये विनोद तावडे, तरुण चूघ, अनुराग ठाकूर, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आदींची नावे प्रसिद्ध केली. धर्मेंद्र प्रधान, मनोहर लाल खट्टर, हरदीप पुरी आदींची हकालपट्टी केली. निर्मला सीतारामन, नितीन गडकरी यांची खाती बदलली. सगळ्या माध्यमांनी आपल्याला हवी ती नावे मोदींच्या मंत्रिमंडळाच्या यादीत घुसविली किंवा काढून टाकली. यापलीकडे या बातम्यांमधून अजून तरी काही साध्य झाले नाही.

– भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाविषयी पतंगबाजी

माध्यमांनी यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाविषयी अशीच पतंगबाजी केली होती. त्यामध्ये किमान दहा-वीस नावांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली होती. त्यामधली राजकीय समीकरणे, बेरजा वजाबाक्या मांडल्या होत्या. बरेच गुणाकार – भागाकार केले होते‌, पण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाविषयी माध्यमांचे एकही गणित बरोबर आले नाही. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नावांपैकी एकही नाव खरे ठरले नाही. उलट माध्यमांनी ज्या नावाची बिलकुल चर्चा केली नव्हती, असे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आले. मोदी आणि शहा यांनी नितीन नवीन या बिहार मधल्या तरुण नेत्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. मोदींनी माध्यमांना त्यावेळी मोठा चकमा दिला होता. तरीसुद्धा माध्यमे सुधारली नाहीत त्यांनी मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पतंगबाजी करणे थांबविले नाही. त्यापलीकडे या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.

Modi cabinet ever turned out to be true so far? So, going forward…

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात