राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

जयपूर : आम्ही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या जंगलराजबद्दल ऐकले होते. पण आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जंगलराजचे साक्षीदार आहोत. अशोक गेहलोत मुस्लिम तृष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला.In Rajasthan, Ashok Gehlot’s Jangal Raj, BJP MP Tejaswi Surya’s allegations

राजस्थानातील करोली येथे पाडव्याला नववर्ष दिनी हिंदू युवकांच्या मोटारसायकल रॅलीवर मुस्लिम भागात दगडफेक झाली. त्यामुळे दंगल भडकली असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. यामध्ये जखमी झालेल्या हिंदू तरुणांना भेयण्यासाठी सूर्या निघाले होते. मात्र, त्यांना करौली सीमेवर ताब्यात घेण्यात आले.



त्यानंतर सोडण्यात आल्यावर सूर्या यांनी जयपूर येथे उपचार सुरू असलेल्या तरुणाची भेट घेतली. यावेळी बोलताना सूर्या म्हणाले, अशोक गेहलोत हे मुस्लिम तृष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. करौली हिंसाचारात बळी पडलेल्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे.2 एप्रिल रोजी नवसंवत्सर (हिंदू नववर्ष) रोजी मुस्लिमबहुल भागातून जाणाऱ्या मोटारसायकल रॅलीवर कथित दगडफेकीनंतर करौलीमध्ये जातीय संघर्ष उफाळून आला. हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

भाजपच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हिंसाचारात जाळलेल्या दुकानांना भेट देण्याची आणि पोलिसांनी अटक केलेल्या काही जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली. त्याआधी काँग्रेसने ५ एप्रिल रोजी आमदार जितेंद्र सिंग, रफीक खान आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ललित यादव यांची तीन सदस्यीय तथ्यशोधन समिती या भागात पाठवली.

In Rajasthan, Ashok Gehlot’s Jangal Raj, BJP MP Tejaswi Surya’s allegations

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात