मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती Delhi Excise Case K. Court shocks Kavita Judicial custody till April 23
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. आता राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत कोठडीवर पाठवले होते, हा कालावधी आज म्हणजेच सोमवारी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली होती.
के. कविता यांना तिहार तुरुंगातून अटक करण्यात आली होती. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी संपताच सीबीआयने त्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले, तेथून आता के. कविता यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वास्तविक, विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर सीबीआयचे पथकाकडून कारागृहातच कविता यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारला 100 कोटी रुपयांची कथित लाच देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. के कविता यांना ईडीने 15 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील राहत्या घरातून अटक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App